पुणे-समाजाची फसवणूक आता चालणार नाही . आता कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे . आपण सरवणी हातात हात घालून काम करणार आहोत . मुस्लिम अल्पसंख्यांक व पुणेकरांच्यावतीने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला . पुणे कॅम्प मधील आझम कॅम्पसमधील असेम्ली हॉलमध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यास अप्पर पोलिस आयुक्त कैसर खालिद , हाजी इसहाक चाविवले , बासित शेख ,नगरसेवक अशोक येनपुरे , इक्राम खान ,मौलाना डॉ. शबि अहसन काझ्मी, अली इनामदार , लतिफ़ मकदूम , पोलिस निरीषक फिरोज बागवान , अक्रम मदारी आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले कि , सर्व धर्माला बरोबर घेऊन आपण काम करतो म्हणूनच आत्मविश्वासाने काम करतो दोन समाज एकत्र आले पाहिजे , त्यातून कठीण परिस्थिती दूर होईन . मागचा इतिहास विसरून पुढील आपले भवितव्य ठरवायचे आहे . सर्वजण वातावरण बदलून एकमेकांचा विश्वास निर्माण करण्याचे काम करत आहे . कोणत्या समाजावर मी टीका करणार नाही , शिक्षणावर मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाने लक्ष केंद्रित केले पाहिजे . त्यामुळे शिक्षणातून माणूस भावनिक होत नाही . मुस्लिम समाजाने चांगले व्यवसाय करण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे . समाजाने शिक्षणाबरोबर पुढे आले पाहिजे . सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी खूप योजना आखलेल्या आहेत . या सर्व योजना अंमलबजावणीसाठी आपण लक्ष देणार आहोत
यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी सांगितले कि , आपण आपल्या पदाचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी करणार आहोत , समाजाने देखील काम करताना कोठे अडचण भासल्यास माझ्याशी संपर्क साधला पाहिजे . जास्तीत जास्त कामे या आयोगाकडून करण्याचा माझा विश्वास आहे . अल्पसंख्यांक महाविद्यालयाच्या ५० टक्के सवलती आहेत त्या मिळत नाहीत . या सवलती मिळण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे . महाराष्ट्रातील पहिले अल्पसंख्यांक महाविद्यालय राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री एकनाथ खडसे यांच्या सहकार्याने जळगाव येथे सुरु करणार आहे .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत बासित शेख यांनी केले तर सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले तर आभार हाजी इसहाक चाविवले यांनी मानले .