पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास सीबीआय नव्याने करणार आहे. पाच वर्षांपूर्वी सतीश शेट्टी यांची तळेगावात निर्घृण हत्या करण्यात आली होती. शेट्टी यांचे मारेकरी सापडत नाहीत, असं कारण देऊन सीबीआयने आठ महिन्यांपूर्वी या खुनाचा तपास बंद केला होता. जानेवारी महिन्यात सीबीआयने घातलेल्या काही छाप्यात सतीश शेट्टींच्या हत्येसंदर्भात काही पुरावे नव्याने मिळाल्याचं सीबीआयने स्पष्ट केलंय. यामुळे सीबीआय या हत्या प्रकरणाचा तपास नव्याने करणार आहे.सीबीआयने मावळ कोर्टात या खून प्रकरणाचा तपास अहवाल सादर करताना आरोपी सापडत नाहीत, असं सांगत तपास बंद करत असल्याचं स्पष्ट केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानेच सतीश शेट्टी यांनी आरआयबीचे वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीचा फेरतपास करण्याची परवानगी मिळाली होती.या हत्या प्रकरणाचा तपास करताना अनेक कच्चे दुवे सांधले जात नव्हते. नेमक्या याच दुव्यांची माहिती सीबीआयला एका बिल्डरच्या घरावर तसंच कार्यालयावर छापे घालताना मिळाले, असं सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आलंय. नोव्हेंबरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका वेगळ्या गुन्ह्याबाबत जानेवारी महिन्यात सीबीआयने हे छापे घातले होते.
सतीश शेट्टी हत्याप्रकरण -सीबीआय बंद केलेली फाईल पुन्हा उघडणार
Date: