( बाल मधुमेय दत्तक योजनेला सुरवात )
पुणे : संस्कार ग्रुप आणि संस्कार आयुर्वेद याच्या संयुक्त विद्यमानाने नुकतीच ‘बाल मधुमेही’ दत्तक योजनेची सुरवात करण्यात आली. या प्रसंगी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी संस्कार उद्योगसमूहाचे अध्यक्ष मा. वैकुठ कुंभार, संस्कार आयुर्वेदचे मा. डॉ. रविंद्र नांदेडकर, मा. खासदार गजानन बाबर उपस्थित होते. १ ते १८ या वयोगटातील बाल मधुमेही ( जुवेनाइल डायबेटिक ) या रुग्णांची तसेच प्रौढ मधुमेही रुग्णांची मोफत रक्तातील शर्करेची तपासणी करून औषध उपचार करण्यात आले. या वेळी मधुमेही रुग्णांबरोबरच नागरिक देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळ संस्कार उद्योगसमूहाचे वैकुठ कुंभार यांनी संस्थेच्या सामजिक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि डॉ. नांदेडकर यांनी मधुमेहाच्या औषधा संदर्भात अथक संशोधन करून नागरिकांना मधुमेहाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. या वेळी मधुमेह मुक्त भारत अभियानाच्या योजनेला प्रारंभ झाला. या वेळी डॉ. नांदेडकर म्हणाले; आम्ही बालमधूमेहांसाठी विनामुल्य मोहीम हाती घेतली आहे. आम्हाला भारतातील बालमधूमेहांच्या रुग्णांच्या पालकांनी संस्थेशी संपर्क साधल्यास त्यांची मोफत तपासणी व औषध उपचार करू. आमच्या संस्थेचे प्रतिनिधी दर सहा महिन्यांनी संबंधित बालमधुमेही यांच्या घरी जावून त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत
या वेळी डायबेटिक जीवनावरचं शुगर फ्री नाटक ‘साखर खाल्लेला माणूस ’ सादर करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मधुमेह संशोधक व राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. रविंद्र नांदेडकर यांनी मधुमेह संबंधीचे बहुमुल्य मार्गदर्शन उपस्थित असणाऱ्या नागरिकांना केले. भारत हि जागतिक मधुमेह रुग्णांची राजधानी होत असताना यावर संस्थेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.