पुणे-
संविधान दिनानिमित दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने पुणे लष्कर भागातील मराठी , उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या अकरा शाळामधील ८०० विद्यार्थ्यानी ” प्रभात फेरी ” काढून साविधानाविषयी जनजागृती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले . या प्रभात फेरीची सुरुवात लष्कर भागातील राणी लक्ष्मीबाई उद्यानच्या प्रवेशद्वारापासून पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख यांनी ध्वज उंचावून केले .यावेळी प्रभात फेरीचे सयोजंक दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहीद इनामदार , नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेवक अतुल गायकवाड , मनजितसिंग विरदी , ग्रंथमित्र दिलीप भिकुले , दि मुस्लिम बँकेचे माजी संचालक चांद शेख , संदीप भोसले , असिफ शेख , अझिम गुडाकुवाला , विजय भोसले , विकास भांबुरे , भारती अंकलेल्लु , जेम्स पॉल , सेंट मार्गारेट शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ विधाते , अंग्लो उर्दू शाळेचे माजी मुख्याध्यपिक प्रा. सिकंदर शेख , गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे मुख्याध्यापक प्रा. अहमद शेख , कॅम्प एजुकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जगताप , मोलेदिना प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नसीम खान व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयी असो …… , संविधान दिन चिरायु होवो … अशा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या .
या ” प्रभात फेरी ” चा समारोप महात्मा गांधी रोडवरील अरोरा टावर्स जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सर्व पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला .या प्रभात फेरीमध्ये हाजी सालेह मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळा , कॅम्प एजुकेशन सोसायटी मराठी प्राथमिक शाळा , सेंट अंथोनी इंग्लिश प्राथमिक शाळा , सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळा , मोलेदिना इंग्लिश प्राथमिक शाळा , अब्दुल वाहेद उर्दू प्राथमिक शाळा , उत्कर्ष प्राथमिक व माध्यमिक शाळा , तैयाबिया अनाथ आश्रम , मोलेदिना टेक्निकल हायस्कूल व अन्य मराठी इंग्लिश शाळा सहभागी झाला . हि प्रभात फेरी महावीर चौक , महात्मा गांधी रोड , अरोरा टावर्स , डॉ बाबसाहेब आंबेडकर रोड , इस्ट स्ट्रीट , इंदिरा गांधी चौक समाप्त करण्यात आली . या फेरीचे मार्गावर विविध संस्था आणि मंडळानी स्वागत केले


