पुणे-‘संवाद, पुणे’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक‘मात आशालता वाफगावकर, फैय्याज आणि नयना आपटे या अभिनयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार्या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्यांनी गेल्या पन्नास वर्षांतील सिने-नाट्य सृष्टीचा प्रवास प्रेक्षकांसमोर सादर केला. या अभिनेत्रींनी सादर केलेले अनुभव, प्रवेश आणि विविध गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
आशालता वाफगावकर यांनी ‘मत्स्यगंधा’ नाटकातील गीत, पु. ल. देशपांडेंच्या ‘वार्यावरची वरात’मधील कवडेमामी आणि अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा या अभिनेत्यांबरोबरचे अनुभव सादर केले.
पार्श्वगायीका फैय्याज यांनी ‘तो मी नव्हेच’ मधील चंनम्मा ही व्यक्तिरेषा आणि ‘ईच्छा माझी पुरी करा’मधील लावणी सादर केली. दादा कोंडके, आशा भोसले यांचे आठवणीतील किस्से सांगितले.
नयना आपटे यांनी ‘संगीत सौभद्र’ आणि ‘एकच प्याला’मधील पदे आणि प्रवेश सादर केले. त्यांनी सादर केलेल्या विनोदी प्रवेशांनी प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. सुधीर गाडगीळ यांनी या तिघींना बोलते केले. ‘संवाद’चे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या संकल्पनेतून कार्यक‘म आयोजित करण्यात आला होता.
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते या अभिनेत्रींचा विशेष गौरव करण्यात आला. साहित्यिका डॉ. माधवी वैद्य, उल्हासदादा पवार, भारत देसडला यांची प्रमुख उपस्थिती होती. निकिता मोघे यांनी आभार प्रदर्शन केले. केतकी महाजन यांनी संयोजन केले. ‘संवाद’च्या वतीने गेली २२ वर्षे या कार्यक‘माचे आयोजन करण्यात येते.