संवादातून नाते जपावे : सुभाषचंद्रा
पुणे : आजकालची पिढी हि तंत्रज्ञानात जरी पुढे असली तरी त्यांच्यातील संवाद कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो यामुळेच हि पोकळी भरून काढण्याचे काम संवादातून होत असते, म्हणूनच संवाद हा अधिकाधिक मजबूत आणि मैत्रीपूर्ण बनवण्याचे काम या नव्या पिढीने करावे असे मत एस्सेल ग्रुप चे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्रा गोयल यांनी व्यक्त केले. ते काल डीएसके इंटरनैशनल कॅम्पस येथे बोलत होते.
डी. एस. कुलकर्णी यावेळी म्हणाले कि नाती जपण्यासाठी परस्परांमध्ये आदर, प्रेम आणि जिव्हाळ्याचे नाते असणे आवश्यक असते मग ते कुटुंबामध्ये असो वा व्यावसायिक जीवनात, आम्ही आमच्या प्रत्येक कामामध्ये ते जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो आणि आणि हेच आमच्या यशाचे गमक आहे असे मला वाटते.
याप्रसंगी डॉ. सुभाषचंद्रा गोयल यांनी संवाद कौशल्याचे फायदे, त्यातून नात्यांची होणारी जडणघडण आणि दोन पिढ्यांमधील संवादात होणारे बदल याविषयांवर विद्यार्थ्याशी मनमोकळया गप्पा मारल्या.
यावेळी डीएसके उद्योगसमुहाचे अध्यक्ष डी. एस कुलकर्णी, डीएसके इंटरनैशनल कॅम्पसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निनाद पानसे आणि तेथे शिकणारे समस्त विद्यार्थी उपस्थित होते.