पुणे, ५ नोव्हेंबर: उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड येथे होणार्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानेही मराठी भाषेच्या प्रसारासाठी तांत्रिक दृष्ट्या दोन पावले पुढे गेले पाहिजे. त्यातून मराठी साहित्याचा प्रसार संमेलनाच्या संकेतस्थळाबरोबरच मोबाईल ऍपच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत जास्तीत जास्त पोचवला पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे संस्कृतिक कार्य तसेच शालेय व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
तावडे यांच्या हस्ते संमेलनाच्या संकेतस्थळाचे तसेच रेडिओ ध्वनीफितीचेही उद्घाटन माऊसच्या क्लीकने त्यांनी केल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या घटनेचे स्वागत केले. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात झालेल्या या दिमाखदार सोहळ्यास संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, सचिव प्रकाश पायगुड, खजिनदार सुनील महाजन तसेच राजेश पांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ुुु.ीरहळींूरीरााशश्ररप.र्विी.
सांस्कृतिक मंत्री हा मंचावर दिसण्यापेक्षा त्याने राबवलेल्या धोरणातून दिसला पाहिज, असे सांगून तावडे म्हणाले की, मराठी साहित्य व साहित्यिकाची स्वायत्तता ही जपली गेली पाहिजे. म्हणूनच मंत्रालयात खेटे घालण्याआधीच ८९व्या संमेलनाचा सरकारी निधी दसर्याच्या आदल्या दिवशीच आम्ही बँकेत जमाही केला. हा जनतेचा पैसा असून त्यातून साहित्यासाठी चांगली कामेच होऊ शकतात.
मराठी साहित्य व साहित्यिकांचे स्थान टिकवणे हे राजव्यवस्थेचे काम असून मराठीतले चांगले साहित्य हे भारतीय तसेच इंग‘जीत नेण्याचा मोठा कॅनव्हास (अवकाश) मिळणे आवश्यक आहे. यासंबंधी बोलताना तावडे पुढे म्हणाले की, रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली डब्ल्यू. बी. येट्स याने इंग‘जीत आणल्यानेच त्यास नोबेल पुरस्कार मिळाला, तसे मराठीतले चांगले साहित्यही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुवादित व्हायला हवे. मराठी साहित्याचा खर्या अर्थाने प्रसार व्हावा यासाठी वाईजवळील बिलार येथे पुस्तकांचे गाव तयार करण्यात येणार असून तिथे सुमारे पाच लाख पुस्तके आणि सुटीच्या दिवसांमध्ये आवडत्या साहित्यिकांबरोबर साहित्यावर चर्चा व संवाद साधण्याची संधी साहित्यप्रेमींना मिळावी याचीही व्यवस्था केली जाणार आहे. मराठी वाचनाची आवड वाढावी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने केवळ मराठी पुस्तक विक‘ीसाठी एक हजार चौरस फुटची जागा कमी दरात उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही तावडे यांनी केले.
स्वागताध्यक्ष डॉ. पाटील म्हणाले की, यापूर्वी संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन मुंबईत राज्यपालांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते घडण्याची ऐतिहासिक घटना घडली. त्यापाठोपाठ संमेलनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात व्हावे, ही इच्छाही आता पूर्ण झाली आहे. आमच्या विद्यापीठाला ८९वे संमेलन आयोजित करण्याची संधी मिळत असून आमचा खारीचा वाटा आम्ही उचलू आणि या संधीचे सोने करू. भविष्यातही मराठी साहित्यप्रसाराचे आमचे काम चालूच राहील.
मराठी भाषा समृद्ध असली तरी तिच्यातला संवाद मात्र कमी होत असल्याचे सांगून डॉ. मोरे म्हणाले की, संमेलनाच्या संवाद साधणार्या संकेतस्थळामुळे संवादसंस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तर माहिती व प्रेरणा या दोन्ही दृष्टीने ते संमेलनाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.
महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. वैद्य म्हणाल्या की, शिक्षणमंत्री तावडे यांनी कलाशाखेकडे जास्त लक्ष पुरवणे गरजेचे आहे, कारण साहित्य माणसाला घडवते, मनाची मशागत करत असल्यामुळे या शाखेचा विस्तार कसा होईल, याचा विचार व्हायला हवा. तसेच अभ्यासक‘मातून हद्दपार झालेले मराठी वैचारिक साहित्य पुन्हा कसे समाविष्ट होईल, याकडेही लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांनी कार्यक‘माचे सूत्रसंचालन केले, तर सोमनाथ पाटील यांनी आभार मानले.
संमेलनाच्या संकेतस्थळासह मोबईल ऍपद्वारे तरुणांशी संवाद वाढवावा सांस्कृतिक व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची अपेक्षा
Date:

