(पहा वारीतले फोटो )
पुणे- विठ्ठल विठ्ठल … माऊली माऊली… ग्यानबा -तुकाराम ‘ चा जयघोष … टाळ मृदुंग व हरी नामाच्या गजरात लाखो वारकरी व पुणेकरांच्या जनसागरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोहोंच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले. मोठ्या उत्साही वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी आज सायंकाळी पुण्यात प्रवेश केला. पुणेकरांनी दोन्ही पालख्यांचे भव्य पद्धतीने स्वागत केले.
हजारो भाविक , अनेक राजकीय पुढारी कार्यकर्ते ,पत्रकार यांनी या पालख्यांचे वारीत सहभागी होत दर्शन घेत भक्ती भावाने स्वागत केले मात्र राज्याचे राज्यपाल के. विद्यासागर राव हे पालखी दर्शनासाठी पुण्यात आले असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दर्शन न घेताच मुंबईत परतावे लागले. पुणे पोलिसांनी नकारात्मक अहवाल दिल्यानंतर राज्यपाल राव यांनी दर्शन न घेता परत जाण्याचा निर्णय घेतला. दिंडी मालक संघटना आज पुण्यात आंदोलन करणार आहे. यामागे पंढरपूर शहरातील स्वच्छतेबाबत हायकोर्टाने बजावलेल्या आदेशाने दिंडी मालक संघटना व सरकार यांच्यात छुपा संघर्ष सुरु आहेअसे सांगितले जाते .
देहूहून पंढरपुरला निघालेली तुकाराम महाजारांची पालखी आपला आकुर्डी येथील दुसरा मुक्काम हलवून पुण्यामध्ये दाखल झाली. तुकाराम महाराजांच्या पालखीपाठोपाठ आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यनगरीत दाखल जाली.

संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी-चिंचवडकरांचा पाहुणचार घेऊन दापोडी-खडकीत पोहचली. त्यानंतर सायंकाळी ती पुण्यात दाखल झाली. तिकडे आळंदीहून भोसरी, दिघी विश्रांतवाडी मार्गाने संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्यात दाखल झाली. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या दोन्ही पालख्याचे भव्य स्वागत करण्यात आले. दोन्ही पालख्यांचा आज व उद्या असा दोन दिवस पुण्यात मुक्काम राहील. या काळात पुणेकर वारक-यांना मोठया प्रमाणात अन्नदान करणार आहेत.
संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात व संत तुकाराम महाराज महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामास असून, रविवारी(12 जुलै) पुढील मार्गाकडे प्रस्थान ठेवणार आहे. चांदीच्या रथात विराजमान झालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात करण्यात आले.
वाकडेवाडी जवळील पाटील इस्टेट येथे महानगरपालिकेच्या वतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले.ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथापुढे 27 व मागे 201 दिंड्या असून, तुकाराम महाराजांच्या पालखी रथापुढे 25 व मागे 304 दिंड्या आहेत.विविध राजकीय पक्ष,सामाजिक संस्था,संघटनां,सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे तसेच सर्वधर्मिय नागरिकांच्या वतीने वारकऱ्यांना पिण्याच्या पाणी आणि खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वापट करण्यात येत होते.पालखी दर्शनाकरीता रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.माऊली व तुकोबांच्या पालखी समोरून डौलाने चालणाऱ्या अश्वांचेही दर्शन नागरिक मोठ्या भक्तीभावाने घेत होते.

दरम्यान संगमवाडी येथे पालखी थांबविण्यात आली होती , ज्याप्रमाणे आळंदीतून उशिरा पालखी निघाली – आणि वेळोवेळी आंदोलनाचा इशारा देत गेली वारकरी संघटनेने आपली भूमिका मांडली या भुमिकेबद्दलचा वाद मिटल्याने संगमवाडी येथे थांबविण्यात आलेली ज्ञानेश्वर माउलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली . सरकारने वारक-यांच्या मागण्या उच्च न्यायलयासमोर योग्यरित्या मांडाव्यात. तसेच तसे निवेदन जिल्हाधिका-यांनी वारकरी-फडकरी दिंडी मालक संघटनेला आणून द्यावे. त्यानंतरच पालखीचे पुढे मार्गस्थ होईल, अशी भूमिका संघटनेने घेतली होती.
आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे होणा-या वारीदरम्यान मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरते. तसेच तेथे शौचालयांची व्यवस्था नसल्याने वारीनंतर हाताने मैला साफ करण्याची कुप्रथा कायम असल्याची बाब एका स्वयंसेवी संस्थेने याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत ही कुप्रथा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सुरू असल्याबाबत राज्य सरकारला धारेवर धरले होते.
वारक-यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटात तंबू उभारण्यासही बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने या संदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे वारक-यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वारकरी-फडकरी दिंडी समाजामध्ये नाराजीची भावना आहे.