पुणे-शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये “मी दाऊद इब्राहिमला दम दिला आहे,” असं वक्तव्य केलं. यावरुनच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत यांची तुलना निलेश राणे यांनी थेट पिसाळलेल्या कुत्र्याबरोबर केली आहे.
पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात राऊतांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिले. यावेळेस पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना संजय राऊत, “मी दाऊद इब्राहिम पासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊद इब्राहिमला दम देखील दिला आहे,” असं म्हणाले. त्याचबरोबर “बाळासाहेब ठाकरे माझी फायर ब्रँड एडिटर अशी अनेक ओळख करून द्यायचे,” अशी आठवणही यावेळी राऊत यांनी करुन दिली.
काय म्हणाले निलेश राणे
“मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला आहे,” या संजय राऊतांच्या वक्तव्य म्हणजे चांगला विनोद असल्याचा टोला निलेश राणे यांनी ट्विटरवरुन लगावला आहे. “खूप दिवसांनी चांगला जोक वाचला. मला माहित नाही नवीन कायदा काय आहे पण पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता. संज्या सारखा लुक्का दाऊदला दम भरायला लागला म्हणून दाऊद संपला. संज्या आताच्या आता पाकिस्तानात दम भरायला सुरू कर,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.