पुणे –
महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि काँग्रेस कार्यकर्त्या संगीता रवी तिवारी (वय. ४८ रा. कुमार कृती, कल्याणी नगर) यांनी पतीच्या विरोधात मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी रवी तिवारी यांच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेत शिक्षण मंडळ अध्यक्ष असताना तू कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून, इतकी मोठी रक्कम कोणाकडे ठेवली आहे, तुझ्याकडील सोन्याचे दागिने आणि पंचवीस लाख मला आणून दे, अशी मागणी रवी यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ आणि मारहाणही होत असल्याचे श्रीमती तिवारींनी म्हटले आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपण पोलिसांत धाव घेतल्याचेही तक्रारी म्हटले आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता तिवारी या मनमिळाऊ आणि धाडसी कार्यकर्त्या म्हणून राजकीय वर्तुळात परिचित होत्या . भाजपचे दिलीप कांबळे जेव्हा आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा तिवारी या त्यांच्या खंद्या समर्थक होत्या . त्यांनतर मात्र त्यांनी काँग्रेस(आय )मध्ये प्रवेश केला सुरेश कलमाडी यांचे नेतृत्व पत्करले . मीरा कलमाडी यांच्या अगदी जवळच्या सहकारी म्हणूनही त्या परिचित होत्या . या सर्व राजकीय प्रवासात त्यांना पतीची आणि एकूणच कुटुंबाची मोठी साथ मिळाली होती . पण देशातील -राज्यातील काँग्रेस ची सत्ता गेली आणि पुण्यातील कलमाडींचे नेतृत्व हि लयास गेले . त्यानंतर या कुटुंबात झालेली हि आणि विशेष म्हणजे चव्हाट्यावर आलेली बाब राजकीय कार्यकर्त्यांना आपल्या वैक्तिक आयुष्यासाठी बरेच काही सांगून जाणारी आहे .