संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावर पीएमपीएमएलच्या नियोजना नुसार रेनबोबीआरटी च्या चाचणी फेरी सुरु झाल्या आहेत.
संगमवाडी–विश्रांतवाडी आणि सांगवी-किवळे मार्गावर १४० ट्राफिक वार्डनची टीम तैनात करण्यात आली आहे. हि टीम ट्राफिक/ रहदारीच्या नियोजना साठी, इतर वाहनांनी रेनबो बिआटी लेन मध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यासाठी आणि प्रवाश्यांना काही कळीच्या ठिकाणावरून रस्ता ओलांडण्यास मदत करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या काही दिवसांचा अनुभव चांगल असून, खाजगी वाहनचालकांची रेनबो बीआरटी लेन मध्ये वाहन नेण्याच्या संख्येत घट झाली आहे. वाहन चालक ट्राफिक वार्डनच्या सुचना पाळत आहेत. फक्त ज्या ठिकाणी वाहतूकीचा ताण ज्यास्त आहे तेथे काही अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) श्री.विनोद, वार्डन अधिकारी, पीएमपीएमएल यांनी दिली.
विश्रांतवाडी टर्मिनल येथे बस वळविताना संभाव्य वाहतूक कोंडीचा विचार करून तेथील ट्राफिक वार्डनची संख्या वाढवण्यात आली आहे. ट्राफिक वार्डन येथे ८ तासांची पाळी पूर्ण करतील, येथे बदली ट्राफिक वार्डनची व्यवस्था करण्यात आल्याने, ट्राफिक वार्डनच्या अवकाश काळात बदली ट्राफिक वार्डन बस वळविताना वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेतील. सांगवी-किवळे मार्गासाठीच्या ट्राफिक वार्डनची भारती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन ट्राफिक वार्डनचे प्रशिक्षण ७ आणि ८ तारखेस केली जाईल, १० ऑगस्ट पासून हे आपल्या निर्धारीन मार्गावर रुजू होतील. निर्धारित रेनबो बीआरटी मार्गावर ट्राफिक वार्डनच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी भारतीय सैन्य पोलीस दलतील (निवृत्त) कार्यक्षम पर्यावेक्षक नेमन्यात आले आहेत.रेनबो बीआरटीच्या चालकांचा कार्यप्रणालीवारही नियमित लक्ष ठेवले जात आहे. रेनबो बीआरटी चालकांना निर्देशित राखीव लेन मधून रेनबो बिआटी बस चालविणे, इतर ट्राफिकशी बसचा संबंध नसल्याने चालकांना अधिक सोयीचे आणि तणावमुक्त असल्याचे श्री सुनील बुरसे, उप कार्यकारी अधिकारी, रेनबो बीआरटी यांनी संगितले. या राखीव लेन मुळे बसला जलद गती मिळण्यात आणि इंधन बचत होण्यास मदत होत आहे. मिक्स ट्राफिक मध्ये बस चालकास वारंवार ब्रेक लावावा लागत असेल्यामूळे बस टायरची होणारी झीज कमी होण्यासही मदत होणार आहे.
रेनबो बीआरटी चालकांना बस बरोबर बस स्थानकाच्या स्वयंचालीत दरवाज्याच्याजवळ उभी करण्यासाठी (डॉकिंगी) मदत व्हावी म्हणून चालकांसाठी बस स्थानकावर निर्देशन पट्टी बसविण्यात आल्या आहेत. सध्या रेनबो बीआरटी चालक हे एक-मेकांच्या कामगिरीचे निरीक्षण करून आपले अभिप्राय एकमेकांना देत आहेत. आयटीएमएस मध्ये बसची जी. पी. एस. स्थिती प्रवाश्यांना माहिती फलकावर वेळेवर दिसण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. संगमवाडी–विश्रांतवाडी मार्गावर रोज किमान १० बस ह्या चाचणी फेऱ्या पूर्ण करत आहेत. एकूण ५८ बस आळीपाळीने चाचणी फेऱ्यामध्ये सहभागी होत आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क
सौ मयुरा शिंदेकर, सी ई ओ, पी एम पी एम एल. मोबाईल – 7774003336 ई मेल ceopmpml@gmail.com
श्री मंगेश दिघे, प्रवक्ता, पुणे म न पा, बी आर टी सेल. मो: 9689931771 ई मेल brtcell@punecorporation.org