गेली काही वर्ष मी इंडस्ट्री मध्ये करतेय. माझ्या करियरमध्ये योग्य संधी आणि वेळ उत्तम जुळून आली. ज्यामुळे मी करत असलेल्या मेहनतीचं रुपांतर प्रगतीत होत गेलं. २०१५ वर्षात घडत गेलेल्या घडामोडी त्याचं उत्तम उदाहरण आहे.त्यामुळेच मी २०१६ ची आतुरतेने वाट पाहतेय. न्यू इअर रिजोल्यूशन करत नाही तर प्रत्येक वर्षी एक डायरी लिहिणं पसंत करते. ज्यात येत्या वर्षात मला करायच्या असलेल्या १० गोष्टी नमूद करते आणि त्या कशा पूर्ण होतील यावर लक्ष्य केंद्रित करते. त्यातील काही पूर्ण होतात तर होत काही होत नाही. त्यामुळे माझं मलाच कळून येत नेमकी मेहनत कुठे करायची आहे ते. माझ्या मते न्यू इअर रिजोल्यूशनचा उद्देश्य देखील हाच असतो. २०१५ माझ्यासाठी खूप लक्की गेले, कारण या वर्षीच्या ‘मितवा’ आणि ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमामुळे मला ख-या अर्थाने लोक ओळखू लागले, आता माझी हि दरमजल आगामी वर्षात येणाऱ्या ‘मिस्टर एंड मिसेस सदाचारी’ या सिनेमातून पुढे सुरु होणार आहे. या सिनेमातून माझा अभिनय प्रेक्षकांना अजून आवडेल अशी मी आशा करते. ५ जानेवारीला असणारा माझा वाढदिवस नेहमीच माझी नवीन वर्षाची सुरवात स्पेशल करते. त्यामुळे नवीन वर्षासाठी मी नेहमीच एक्साईट असते.