नवीन वर्ष म्हंटले तर संकल्पाना उधान येतंच. मी देखील येणा-या प्रत्येकवर्षी वेगवेगळे संकल्प करते, आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. यावेळी मी ‘स्वच्छ परीसर सुंदर देश’ ही मोहीम राबवणार असून माझ्या अवतीभोवतालच्या लोकांनाही तसे करण्यास मी प्रवृत्त करणार आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रत्येकाला एकजुटीने काम करायला हवे, आणि त्यासाठी सर्वप्रथम प्रत्येकांनी आपापल्या घरातून सुरवात करायला हवी, असे मला वाटते. शिवाय येत्या नवीन वर्षातील मराठी आणि हिंदीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील माझ्या प्रोजेक्टवर देखील मी लक्षकेंद्रित करणार आहे. तसेच ‘स्टे फिट, स्टे हेल्दी’ हा माझा नेहमीचा फंडा मी आगामी वर्षीदेखील सुरु ठेवणार आहे.