संकल्प २०१६ -संकल्प जास्तीत जास्त काम करण्याचा :गायिका योगिता चितळे
न्यू ईयर रिजोल्यूशन पेक्षा नव्या वर्षाचे प्लेनिंग करण्यात मी जास्त विश्वास ठेवते . आता माझे जे शोज होत आहेत ते पुढच्या वर्षी देखील सुरु राहणार आहेत, या शोजमधून अधिक जोमाने काम करण्याचा माझा मानस आहे. नुकताच माझा नचिकेत आणि गुरु ठाकूर सोबत कुवेत मध्ये एक यशस्वी कार्यक्रम झाला आहे. तसेच नवीन वर्षात माझे काही आगामी प्रोजेक्ट देखील आहेत, आम्ही एप्रिल महिन्यात एमस्टरडॅम मध्ये युरोपियन मराठी संमेलनात कार्यक्रम करणार आहोत. त्यामुळे नवीन वर्षातील हा माझा मोठा प्रोजेक्ट असणार आहे, शिवाय २०१६ ला माझा अपकमिंग मुंबई टाईम सिनेमा देखील येत आहे, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तो प्रदर्शित होत असल्याकारणामुळे मी त्याबद्दल खूप उत्सुक आहे. त्या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तसेच आगामी वर्षातील काही सिनेमांचेदेखील मी संगीत दिग्दर्शन करणार आहे.