श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा साजरा करणार ..

Date:

श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा येत्या रविवारी गोकुळाष्टमीच्या दिवशी ६ सप्टेंबर २०१५ रोजी साजरा होत आहे . त्यानिमित पुणे शहर जिल्ह्यातील मेहेतर बाल्मिकी समाज बांधव भगवान श्री जाहरविर गोगादेव जयंती उत्सवउत्साहात  साजरा करतात .

    श्री गुरु गोरक्षनाथजींचे शिष्य श्री भगवान वीर गोगादेव , त्यामुळे श्री भगवान वीर गोगादेव यांनी वचन दिले होते कि , जो कोणी निशानाची पूजा मनापासून करेल त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतील . श्री भगवान वीर गोगादेव  यांचे जन्मस्थान राजस्थानमधील गद्रेवा गाव तर राजस्थान मध्येच हनुमानगड येथे समाधीस्थान  ( गोगामेढी ) आहे . गोगामेढीमध्ये देखील जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो . पुणे शहर जिल्ह्यात पवित्र श्रावण मासाच्या पहिला दिवसापासूनच नागपंचमीपर्यंत सर्व निशानांची स्थापना केली जाते . मेहेतर बाल्मिकी समाज बांधव निशानांची स्थापना करतात . या निशानांची सजावटीमध्ये मोरपीस , शेरा , श्रीफळ , दुपटा वापर  करतात . काही निशानामध्ये चांदी , विद्युत रोषणाईनी सजावट करतात . जिथे निशानाची स्थापना केली जाते त्या ठिकाणाला आखाड म्हणतात . या आखाड्यात तीन प्रमुख लोक असतात . यामध्ये निशानाची पूजा करणारा भगत , गोगादेवांची पूजा करणारा , भजन , कीर्तन करणारा खलिपा , निशाण सजविणारा , देखभाल करणारा , निशानाना घेऊन जाणारा सवई घोडे , तर बाकीचे सेवक म्हणून काम करतात . हे सर्व जण व्यसनमुक्त राहून मासांहार व्रज्य करतात . चप्पल न घालणे , केस न कापणे , पांढरे वस्त्र परिधान करणे आदी व्रत नियमाने पाळावे लागतात .

2

  अनेक वर्षापासून निशानाची स्थापना केली जात आहे , पेशवे काळात बसणारे निशानाना पेशव्यांनी ताम्रपट दिल्याची पत्र आहेत . ब्रिटीशकाळातील कागदपत्रे आज देखील आपणास पाहण्यास उपलब्ध आहेत . पुण्यामध्ये मानाचे बसणारे निशाण म्हणजे भवानी पेठ हरकानगरमधील रामलाल भगत निशाण आखाडा , नवा मोदीखाना भागातील अशोक फत्तुजी संघेलिया निशाण आखाडा (लष्कर का राजा ), भवानी पेठ हरका नगरमधील बाराभाई भगत निशाण आखाडा , खडकमाळआळी मधील भगवान भगत निशाण आखाडा , मंगळवार पेठ श्रमिक नगरमधील कैलाश भगत  निशाण आखाडा , भवानी पेठमधील हरकानगरमधील गोपाळ भगत निशाण आखाडा आदी मानाचे निशाण समजले जातात . आता पुण्यात एकूण ४० निशाण आहेत . यामध्ये पुणे कॅम्प भागातील निघणारी निशाणाच्या मिरवणुकीत  २४ निशाण सहभागी होतात , तर खडकीमधील निघणारी निशाणाच्या मिरवणुकीत  १६ निशाण सहभागी होतात .

  कोरेगाव पार्क बर्निंग घाट , औंध , पाटील इस्टेट , सदाशिव पेठ , रामटेकडी , वानवडी , हडपसर , घोरपडी गाव , नवा मोदीखाना , हरकानगर , एम जी रोड , ससून कर्मचारी वसाहत , ताडीवाला रोड , खडकमाळआळी , मंगळवार पेठेतील श्रमिक नगर आदी भागातील २४ निशाण  पुणे कॅम्प भागातील मिरवणुकीत सहभागी होतात . तर खडकी पिंपरी- चिंचवड  , साप्रस , रेंजहिल्समधील १६ निशाण खडकीमध्ये निघणारी मिरवणुकीत सहभागी होतात . या श्रावणमासात मेहेतर बाल्मिकी समाज बांधव  निशान घरोघरी बोलवितात , आपल्या घरी सुख समृद्धी येऊ दे , वीर गोगादेवजीचा आपला कृपा आशीर्वाद मिळू दे हा त्या मागचा उद्देश असतो . त्यालाच ” मिनी बागड ” असे म्हटले जाते . या निशांणाच्या मिनी बागडमध्ये मिरवणूक , भजन कीर्तन , रात्रभर गोगागायन होते यावेळी पारंपारिक डेरू वाद्य व ढोलचा समावेश असतो . यावेळी  सर्वासाठी महाप्रसाद दिला जातो .

  श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळाच्या दिवशी सायंकाळी पुणे कॅम्प भागात भव्य मिरवणूक काढली जाते . या मिरवणुकीची सुरुवात  नवा मोदीखाना भागातील अशोक फत्तुजी संघेलिया निशाण आखाडा (लष्कर का राजा )ची पूजा करून होते . यावेळी सर्वजाती धर्मातील समाज बांधव सहभागी होतात . शहरातील राजकीय , सामाजिक , धार्मिक , शैक्षणिक मधील मान्यवर व्यक्ती मिरवणुकीत सहभागी होतात . या मिरवणुकीत डॉल्बी , डी. जे. स्पिकर्स नसतो . तर पारंपारिक वाद्य , बंण्ड , ढोली बाजा , ढोल लेझीम , झांज पथकाचा समावेश असतो . हि मिरवणूक नवा मोदीखाना , गुडलक हॉटेल चौक , कुरेशी मस्जिद चौक , सेंटर स्ट्रीट , भोपळे चौक , खरीपेढी , सेटर स्ट्रीट पोलिस चौकी , साचापीर स्ट्रीट , महावीर चौक , महात्मा गांधी रोड , संत नामदेव चौक , मोहम्मद रफी चौक , वीर गोगादेव चौक , १५ ऑगस्ट चौक या मार्गाने सर्व निशानाची मिरवणूक काढून पुलगेट पोलिस चौकीसमोरील गोगामेढी येथे मिरवणुकीची सांगता होते . या मिरवणुकीतील सर्व निशांणाचे पुणे महानगरपालिका , विविध राजकीय पक्ष , सामाजिक संस्था , गणेश मंडळे आदी स्वागतकक्ष उभारून स्वागत करतात . त्यांनतर प्रत्येक निशाण गोरखनाथांच्या स्थानाला पाच फेरी प्रदक्षिणा घालतात . सर्व निशाण गोगामेढीवर विराजमान होतात . त्यानंतर सर्व निशाण प्रमुखांचा पुणे लष्कर बेडा पंचायतच्यावतीने शाल , श्रीफळ देऊन मानसन्मान केला जातो . रात्री बारा वाजता महाआरती होते . यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते . अशा प्रकारे श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .

 या उत्सवाच्या संयोजनासाठी पुणे लष्कर बेडा पंचायत , लक्ष्मण सुसगोहेर , कविराज संघेलिया सुरेश मकवानी , किशोर संघेलिया , विक्रम गोहेर , करण मकवानी , दादा चव्हाण , शैलेन्द्र जाधव , संजय वाघिले , मुकेश चव्हाण , प्रकाश सोलंकी , राजेश सहेरिया , योगेश चव्हाण व  मेहेतर बाल्मिकी समाज बांधव परिश्रम घेतात .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...