श्रीक्रृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट च्या बालगोपाळ मेळाव्यास चांगला प्रतिसाद बाल गोपाळांनी पाणी बचतीचा दिला संदेश
पुणे :
श्रीक्रृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट (दहिहंडी उत्सव) वडगाव बु|| पुणे मंडळाने क्रृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त बाल गोपाळ मेळाव्याचे आयोजन केले होते .लहान मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. अनाथ मुलांना खाऊ व वह्यावाटप करण्यात आले. स्व. विक्रांत कुदळे स्मरणार्थ भव्य बालगोपाळ मेळावा आयोजीत करण्यात आला होता. पाण्याचा वापर टाळून बाल गोपाळांनी पाणी बचतीचा संदेश दिला
.यावेळी भूतनाथ रिटर्न्स व किल्ला फेम पार्थ भालेराव हा बाल कलाकार उपस्थित होता.यावेळी जल्लोषात दहिहंडी साजरी करण्यात आली..यावेळी मि.इंडीया सागर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.दहिहंडी फोडण्यासाठी नवजवान गोविंदा पथक (मुंबई) व राजमाता गोविंदा पथक (पुणे) यांना बोलवण्यात आले होते.. नवजवान गोविंदा पथकाने दहिहंडी फोडली
.प्रमुख संयोजक हर्षल झगडे यांनी स्वागत केले . आयोजन युवराज झगडे, गिरीष झगडे, रणजीतसिंह जगताप,अभिषेक कवडे, संतोष हनमघर, दिपक गाडवे व मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी केले.