शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी ‘शिक्षणाची वारी’

Date:

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग आणि ‘श्यामची आई फौंडेशन’ यांच्या संयुक्त

विद्यमाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम’ अंतर्गत “शिक्षणाची वारी” हा अभिनव उपक्रम

दिनांक २७ जानेवारी २०१६ ते दिनांक ३१ जानेवारी २०१६ दरम्यान पुणे येथे आयोजिला

आहे. सदर वारीचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाले.

ग्रामीण तसेच शहरी भागातील निम्न आर्थिक स्तरातील पालकांच्या मुलांच्या उत्तम

दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा व पालिका शाळा यांचे सक्षमीकरण ही

काळाची गरज आहे. याच उद्देशाने जिल्हा परिषद शाळेतील प्रयोगशील शिक्षकांना प्रोत्साहन

मिळावे, त्यांच्यापासून इतरांनी प्रेरित व्हावे यासाठी शिक्षणाची वारी आयोजिली आहे.

शिक्षणाची वारीमध्ये एकूण ५४ स्टॉल्स असून यात शिक्षणाच्या विविधांगी विकासाचे

प्रदर्शन करण्यात आले आहे. कुमठे बीट मध्ये ज्ञानरचनावाद यशस्वीपणे राबविणार्‍या प्रतिभा

भराडे, लोकसहभागातून धुळे जिल्ह्यात तब्बल दीड कोटी उभारण्याचे उपक्रम करणारे शिक्षक,

इ-लर्निंग, कृतीयुक्त अध्यापन, क्रीडा, व्यवसाय शिक्षण, गुणवत्ता वाढ, संगीत, कला –

कार्यानुभव, व्यवसाय समुपदेशन, मूल्यवर्धन, स्वच्छता समावेशित शिक्षण, भाषा अध्यापन,

शिक्षक सहयोगी दल, पर्यावरणपूरक आदी विषयांची मांडणी करणारे स्टॉल्स आहेत. हे सर्व

स्टॉल्स जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचे तसेच शिक्षण क्षेत्रात विविध

पातळ्यांवर कार्यरत असणार्‍या अशासकीय संस्थांचे आहेत. यात श्यामची आई फौंडेशन,

भारतीय स्त्री शक्ती, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, विद्याभारतीची शिशुवाटिका, लेंड-अ-हँड

इंडिया आदी संस्था सहभागी झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून निवडक शिक्षक, अधिकारी या वारीत सहभागी होत

आहेत. दररोज नऊ जिल्ह्यांतील १,८०० नवोपक्रमशील शिक्षक येत आहेत. पाच दिवसांत

एकूण ७,५०० शिक्षक आणि अधिकारी वर्ग वारीत सहभागी होणार आहेत.

सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी वेळ असून त्यानंतर दररोज खुली

चर्चा घेण्यात येते.

रविवार, दिनांक ३१ जानेवारी २०१६ रोजी ‘शिक्षणाची वारी’च्या शेवटच्या दिवशी

सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रदर्शन खुले ठेवण्यात आले

आहे. ‘शिक्षणाची वारी’चे कार्यक्रम स्थळ शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे – बालेवाडी, पुणे

हे आहे. शिक्षणाची वारी मध्ये सहभागी होण्याचे आयोजकांतर्फे सर्वांना आवाहन करण्यात आले

आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतातील त्वचा-सौंदर्य उपचारांसाठी एमक्युटिक्स आणि विको यांच्यात विशेष परवान्याची भागीदारी

 ‘एमक्युटिक्स’ला भारतीय बाजारपेठेसाठी पीआरएक्स-प्लस या औषधाची आयात, त्याचा...

महाराष्ट्रामध्ये ई टॅक्सीला. प्रखर विरोध करणार :-बाबा कांबळे

पुणे:ई टॅक्सी ला दिलेली मंजुरी महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावी,...

पुण्यात घरफोडी करणाऱ्या कर्नाटकच्या चोराला अटक

पुणे-कर्नाटकातून पुणे शहरात दुचाकीवर येऊन वारजे माळवाडी परिसरात घरफोडी...