पुणे- पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती म्हणजेच शेतकरी दिन , त्या निमित पुणे शहर कॉंग्रेस कमिटी आणि पिंपरी चिंचवड कॉंग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर मधील साखर संकुल आवारातील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड , पिंपरी चिंचवड कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे , महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे निरीषक बाळासाहेब साळवे , नगरसेवक अविनाश बागवे , विठ्ठल थोरात , अरुण गायकवाड , दयानंद अडागळे , पिंपरी ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश लंगोरे , वीरेंद्र गायकवाड , आनंद पाटोळे , कुंदन कसबे ,खुर्शीद शेख , नारायण पाटोळे , विलास कांबळे , माउली साठे , शोभाकर तेलोरे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी चंद्रकांत छाजेड यांनी सांगितले कि , पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना सुरु केला , कृषी क्षेत्राला त्यांनी वाव दिला , त्यातून चांगले शेतकरी निर्माण केला . त्यामुळे आज शेतकरी हा प्रगतीशील शेतकरी झाले . शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी त्यांनी प्रवरा शिक्षण संस्थेची स्थापना केली . असे महत्वपूर्ण काम पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी केले .