मुंबई – भाजपा सरकारमध्ये शिवसेना सहभागी होण्याबाबत सकारात्मक चर्चा चालू असून हि चर्चा राज्य पातळीवर नाही तर केंद्रीय स्तरावर सुरु असल्याचे वक्तव्य नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने खरी सूत्रे भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे . भाजपमध्ये महाराष्ट्राचा निर्णय राज्यापातळीवरच घेईल असा नेता आता गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर कोणी उरला नसल्याची भावना राजकीय वर्तुळात पसरली आहे
दरम्यान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आकार छोटाच राहणार असून, आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात 10 टक्के आमदारांचेच मंत्रिमंडळ असणार आहे. याचबरोबर आपले सरकार स्थिर व भक्कम राहावे यासाठी फडणवीस शिवसेनेसोबतच व घटकमित्रपक्षांना सोबत घेणार आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची संख्या 30-32 च्या आसपास असणार आहे. यात भाजपकडे 18, शिवसेनेकडे 8 तर चार घटकपक्षांना 2 कॅबिनेट व 3 राज्यमंत्रीपद अशी एकून 5 मंत्रिपदे दिले जाण्याची शक्यता भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानसभेची संख्या 288 आहे त्यानुसार 10 टक्के मंत्रिपदाचे मंत्रिमंडळ बनवायचे झाल्यास 29 जणांचा समावेश होऊ शकतो. त्यानुसारच भाजप पावले टाकत असून आपल्या सरकारची मंत्रिपदाची संख्या 30-32 च्या वर जाणार नाही याची काळजी घेताना दिसणार आहे.