नवी दिल्ली -शिवसेनेने नव्या सरकारमध्ये१४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भाजपने मात्र केवळ 9 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात सरकारन स्थापन करण्यासाठी शिवसेनेने भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींतर्फे एनडीए नेत्यांसाठी आयोजित केलेल्या डिनसमध्ये सहभागी होणार आहेत. शिवसेना आणि भाजप दोघांचाही उद्देश राज्यात स्थिर सरकार देणे हा असल्याचेही शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
भाजपबरोबर सत्ता स्थापनेच्या संदर्भात शिवसेनेकडून अनिल देसाई हे प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. भाजप २:१ चा फॉर्म्युला ठरवत असल्याने आमचे१४मंत्रि असू शकतात अशी शक्यता देसाईंनी व्यक्त केली आहे. पण हा केवळ अंदाज असून याबाबतचा अंतिम निर्णय २७ ऑक्टोबरला उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात भेट झाल्यानंतरच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांबाबतच्या प्रश्नावर त्यांना अधिक जागा मिळाल्या असल्याने हा निर्णय त्यांच्याकडे असेल असे देसाई म्हणाले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याचा फैसला २७ ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर संसदीय पक्षाचा नेता निवडल्यानंतर २८ ऑक्टोबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे.