विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी स्वच्छतेचा संकल्प करावा-सौ.मंजुश्री खर्डेकर
बाल दिना निमित्त पंडित दीनदयाळ शाळेत स्वच्छता अभियान कार्यक्रम
———————————————————————————————————
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर”बाल स्वच्छता मिशन” मोहिमेचे आवाहन केले होते.यास अनुसरून शिक्षण मण्डल सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी एरंडवना परिसरातील पुणे म न पा च्या पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत आज या उपक्रमाचे आयोजन केले होते.या अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वच्छ शाळा,स्वच्छ परिसर,स्वच्छ खेळाची मैदाने यासह वैयक्तिक स्वच्छतेवर ही भर द्यावा असे आवाहन सौ.खर्डेकर यांनी केले.यास अनुसरून शाळेतील बालवाडी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आज शाळेचा परिसर स्वच्छ केला.या वेळी आमदार मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी ही विद्यार्थ्यांसह शाळेचा परिसर झाडून काढला.या वेळी प्रा.मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते शाळेची नियमित सफाई करणारया सफाई कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.आ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या “शाळेच्या सफाई बरोबरच आपण आपल्या घरा भोवतीचा परिसर हे स्वच्छ ठेवला पाहिजे,यामुळे रोग राई ही दूर होते व परिसर प्रसन्न राहतो.”या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एलीझाबेथ काकडे,पर्यवेक्षिका रहिंज मॅडम,तसेच अमोल डांगे,सुधीर फाटक,सुमीत दिकोंडा,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष माटुंगे ताई व अनेक पालक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना कायमच स्वच्छता राखण्याची शपथ देण्यात आली.
भावी काळात देखील स्वच्छतेचे महत्वा पटवून देणारे कार्यक्रम,व्याख्याने,तसेच स्वच्छ शौचालये व पिण्याचे स्वच्छ पाणी यासंदर्भातील मोहीम मतदारसंघातील सर्वच शाळांमधे राबविण्यात येतील असे आमदार प्रा.मेधा कुलकर्णी व शिक्षण मण्डल सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.