पुणे-अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसच्यावतीने पुणे कॅम्पमधील वजीर भगत संघेलिया चौकातील श्री जाहरवीर गोगादेव मंदिराजवळ शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुगंधी गोड दुधाचे वाटप संरक्षण विभागाचे मालमत्ता विभागाचे संचालक ए. भास्कररेड्डी यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनुप बेगी यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विनोद मथुरावाला , नगरसेवक अतुल गायकवाड , मनजितसिंग विरदी , मन्नू कागडा , कैलाशकुमार , अरविंद चव्हाण , निखिल बेड , मुकेश चव्हाण , विशाल चव्हाण , घनश्याम सुसगोहेर , राज गौतम , अनिल चावरे , राजेश बागडी , अजय पिवाल , सुनिता गवळी , दिनेश चनाल , नवीन सुसगोहेर , संजय बेगी , रवि भिंगानिया , मनोज पटेलिया , वाहिद बियाबानी, अनिल चावरे , महेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .
नागपंचमी सणासाठी लाखो लीटर दुधाचे नुकसान होते , नाग दुध पीत नाही , त्याऐवजी तेच लाखो लीटरचे दुध अनाथ मुलांना , नागरिकांना वाटण्यात आले . समाजप्रबोधनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला .असे कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनुप बेगी यांनी सांगितले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनुप बेगी यांनी केले तर सूत्रसंचालन विजय बेद यांनी केले तर आभार अरविंद चव्हाण यांनी केले .

