नवी दिल्ली–अभिनेता आणि तृणमूल कॉंग्रेसचा खासदार मिथुन चक्रवर्ती याने शारदा ग्रुपचा “ब्रॅण्ड ऍम्बेसेडर‘ म्हणून स्वीकारलेली 1 कोटी 19 लाख रुपयांची रक्कम अंमलबजावणी संचालनालयाला परत केली आहे.
मिथुन चक्रवर्तीने शारदा ग्रुपचा ब्रँड अम्बेसेडर होण्यासाठी करार केला होता. त्याबदल्यात तब्बल १ कोटी १९ लाख रुपये देखील त्याला मिळाले होते. मात्र या ग्रुपचे नाव चिट फंड घोटाळ्यात समोर आल्यानंतर त्याने हे सगळे पैसे ईडीकडे परत करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आपल्या वाढदिवसच्या दिवशी आपण सारे पैसे परत करू असेही त्याने सांगितले होते. त्याप्रमाणे आज ६५ व्या वर्षात पदार्पण करताना मिथुनने देशाच्या जनतेला दिलेले वचन पूर्ण करून एक अनोखा आदर्श बॉलिवूड अभिनेत्यांसमोर ठेवला. ईडीने केलेल्या चौकशीच्या वेळी त्यांनी संपूर्ण सहकार्य करत शारदा ग्रुपच्या माध्यमातून आपल्याकडे आलेली रक्कम आपण परत करू असे स्पष्ट केले होते. तसेच शारदाच्या प्रमोशन व्हिडिओ आणि जाहिरातीत काम केल्याचेही त्याने ईडीसमोर सांगितले. तसेच हा कराराचा भाग असल्याचेच स्पष्ट केले.