शांताबाई हे गाणे लोकप्रिय झाल्यावर आता या गाण्याचे गीतकार गायक संजय लोंढे हे ‘कोंबडा’ नावाचे नवे गाणे सदर करीत आहेत येत्या बुधवारी ३० डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या’ शांताबाई विथ बॉलीवूड धमाका ‘ या कार्यक्रमात या गाण्याचे अधिकृत लौन्चींग करणार आहेत यावेळी चित्रपट दिग्दर्शक नागनाथ मंजुळे उपस्थित राहणार आहेत
हडपसर येथील मतीमंद मुला मुलींच्या -संजीवनी शाळे च्या मदतनिधीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संजय लोंढे तसेच विकास कुचेकर ,संतोष संखद , इनायत शेख यांनी सांगितले