शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. खासदार, शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम टीळक रोड येथील पक्ष कार्यालयात पार पडला. महात्मा गांधीजींच्या आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक राठी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शंकर शिंदे, युसुफ शेख, मनाली भिलारे, अविनाश वेल्हाळ, राजूशेठ गिरे, सुरेश पवार, योगेश वराडे, शिल्पा भोसले, संजय गाडे, शालिनी जगताप, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.