पुणेः स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा धोका आता प्रौढ, ज्येष्ठांसह आता लहान मुलांनाही होऊ लागला आहे. येरवडा येथील चौदा वर्षांच्या ग्लोरिया कुडूक नावाच्या मुलीचा इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यामुळेश हरातील मृतांची संख्या एकवीसवर पोहोचली आहे. या आजाराचे गांभीर्य वाढले असून, शहरात सध्या २४ जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
ग्लोरिया कुडूक मुलगी येरवड्यात राहत होती. लक्षणे दिसून आल्यानंतर तिच्या लाळेची तपासणी करण्यात आली. त्यात २० फेब्रुवारीला तिला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले. मात्र, निदान होण्यापूर्वीच तिचा स्वाइन फ्लू तसेच सेप्टिसिमियाच्या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. उपचारासाठी दोन दिवस उशीर झाल्याची नोंद आरोग्य खात्याने केली आहे.