पुणे :
शिवजयंतीनिमित्त महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल व महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सकाळी प्रथम पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरीमातेचे पूजन केले. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी असणार्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापौर आणि उपमहापौरांनी एसएसपीएमएस शाळेतील व लालमहाल येथील राजमाता आणि शिवाजी महाराज यांचा पुतळा, कोथरूड येथील अश्वारूढ पुतळ्यास, तसेच सभागृहाजवळील त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवजयंती उत्सवानिमित्त लाल महाल येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम झाला.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. पक्ष कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते शफी मामू शेख यांच्याहस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. खासदार अँड़ वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी आनंद रिठे, शंकर शिंदे, शालिनी जगताप, समीर निकम, संजय लाड, आनंद कारंडे, सुरेश पवार, बाळासाहेब आहेर, दिनेश खैरे, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कॉंग्रेस भवन येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नीता राजपूत, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, श्ांकर राठोड, उमेश कंधारे, रामचंद्र भुवड, अतुल कारले, शशी बिबले, रविंद्र म्हसकर, राजू गायकवाड उपस्थित होते. पुणे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी सीमा सावंत, स्वाती कथलकर, गीता गारू, जया पारख, आरती गायकवाड आदी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.शिवजयंतीनिमित्त गुरुवारी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.शुक्रवार, २0 फेब्रुवारी २0१५पुणेशिवसंग्राम पुणे शहर व जिल्हा यांच्या विद्यमाने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. महात्मा जोतिबा फुले यांनी सर्वांत प्रथम १८७४ साली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक हिराबागेतून सुरू केली, त्याच ठिकाणाहून यंदाच्या मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी तुषार काकडे, शिवराज मोरे, रविंद्र भोसले, स्वप्नील खडके, भोलाशेठ वांजळे, सचिन कांबळे, तानाजी गंभीरे, सागर फाटक, संजय ढोले यांनी परिश्रम घेतले.
कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटी व अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्या हस्ते मार्केट यार्ड परिसरातील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे युवराज बेलदरे-पाटील होते. नामदेव मानकर, अनिल मारणे, मीना जाधव, युवराज दिसले उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. बीसीयुडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी व्याख्यान आयोजित केले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे लाल महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास लीगल सेलच्या अध्यक्षा डॉ. चित्रा जानगुडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महेश शिंदे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, वसंत बनसोडे, शांतिनाथ चव्हाण, हलिमा शेख, बंडू वाघमारे उपस्थित होते. शिवछत्रपती प्रतिष्ठान व टुडेज यूथ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले सिंहगड ते किरकीटवाडी अशी शिवज्योतीची मिरवणूक महिलांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी मशाल पेटवण्याचा मान महिलांनाच देण्यात आला होता. पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. मिरवणुकीच्या समारोपाच्या वेळी उपस्थित महिलांनी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला.महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमधील २९ शैक्षणिक संस्थांच्या दहा हजार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी आज सकाळी शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. मिरवणुकीचे उद््घाटन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड़ अभय छाजेड, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, डॉ. एन. वाय. काझी यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी एस. ए. इनामदार, अझीम गुडाकुवाला, मजिद उस्मान दाऊद, खालिद अन्सारी, अरीफ सय्यद, शराफत पानसरे, वाहिद बियाबानी, बद्रुद्दीन शेख, प्रा. डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. किरण भिसे, डॉ. शैला बूटवाला, मुमताज सय्यद, दानीश शेख, तसेच सर्व शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य व पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीमध्ये संस्थेच्या कला महाविद्यालयाने सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरील जन्मोत्सवाचा देखावा विशेष आकर्षण ठरला. दरबार बँडची दोन पथके, ढोल-ताशा, इंग्रजी माध्यम शाळेचे बँजो पथक सहभागी झाले होते. या उपक्रमांचे यंदाचे बारावे वर्ष आहे. मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले.