पुणे- शहराच्या विकासाकरिता शहरातील विविध संस्था कंपन्या, कॉर्पोरेट सेक्टर्स एकत्रित येऊन ‘पुणे सिटी
कनेक्ट’ या संस्थेच्या मार्फत शहरात करवायाच्या विविध नागरी सुविधांकरिता एकत्रित येऊन नागरी विकास कामे
करणार आहेत अशा प्रकारचा सहभाग हा अत्यंत कौतुकास्पद असून पुणे शहराच्या दृष्टीने अत्यंत मह्त्त्वाची घटना आहे.
नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यानुसार नागरिक सुविधांवरही मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. मनपास
अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. विविध विकासकामे एकत्रित व मोठ्या प्रमाणावर करण्याकरिता अडचणी येत
असतात. मात्र कॉर्पोरेट, सोशल रिस्पोसिबिलीटी(CSR) अंतर्गत पुढे आलेल्या संस्थाच्या माध्यमाने पुणे शहराचा विकास
झपाट्याने होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. प्रामुखाने घनकचरा प्रकल्प स्वच्छता, शिक्षण, टुरिझम या
क्षेत्रातील विकास होणे अत्यंत आवश्यक असल्याने त्यांनी सांगितले. पुणे सिटी कनेक्ट व पुणे महानगरपालिका यांच्यात
सामंजस्य करार संपन्न झाला. पुणे महानगरपालिकेच्या वतीने मा.महापालिका आयुक्त कुणाल कुमार व पुणे सिटी कनेक्ट
संस्थेचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन यांनी सामंजस्य सामंजस्य करारावर (MOU) सह्या केल्या. सदरचा कार्यक्रम
सेनापती बापट रस्त्यावरील जे डब्लू मेरियट येथे संपन्न झाला.
सदर सामंजस्य करारच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले की सर्व शहरांमध्ये देश,
परदेशात वाढत्या नागरीकारणामुळे नागरी सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. समस्यांची सोडूवणूक
करण्यासाठी आवश्यक नागरीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व एकूण शहर विकासाच्या दृष्टीने सर्वत्र पब्लिक
पार्टनरशिप(PPP) सारख्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वाढत्या नागरीकीकारणामुळे देण्यात येणाऱ्या सुविधांवर ताण येत आहे. प्राप्त परिस्थितीत उपलब्ध निधी अशा
अनेक बाबीमुळे मर्यादा येतात. मात्र पब्लिक पार्टनरशिप द्वारे यातून समस्या निराकरण करण्यास मोठ्या प्रमाणावर मद्दत
होते. पुणे शहराची ऐतिहासिक गौरवशाली परंपरा आहेत. पुण्यात विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ, सल्लगार शहरविकासाकरिता
पुढ्ये येणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचप्रमाणे विविध संस्था, संघटना, स्वंयसेवा संस्था, कंपन्या मोठ्या
प्रमाणावर पुढ्ये येत आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्थरावर कंपन्या पुढ्ये येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पुणे सिटी कनेक्ट
संस्थेच्या माध्यमाने पुणे शहर विकासाकरिता ही उत्तम संधी आलेली आहे. याचा शहरविकासाकरिता नक्कीच फायदा
होणार असल्याने सामंजस्य कराराच्या रूपाने विकासाचे पाउल टाकले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे सिटी कनेक्ट संस्थ्येचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन यांनी सांगितले की शहरविकासाच्या दृष्टीने कॉर्पोरेट,
सोशल रिस्पोसिबिलीटी (CSR) च्या माध्यमाने अनेक संस्था कंपन्या पुढे येत आहेत. मात्र शहरात एकाच कामासाठी
एकाच प्रकल्पासाठी विविध कंपन्यानी खर्च न करता विविध कामासाठी व नियोजनबद्ध निधीचा वापर व्हावा. योग्य
नियोजन व्हावे तसेच विविध कंपन्या व मनपा यांच्यात समन्वय राखून यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी व्हावी
याकरिता पुणे सिटी कनेक्ट ही संस्था महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील
कंपन्याची खर्च करण्याची तयारी त्यांचे व कंपनीचे एकत्रित नियोजन, शहर विकसाकरिता ध्येय, दूरदृष्टी यांचा विचार
करून एकत्रित काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे सिटी कनेक्ट(PCC) हे उद्योगांकडून चालविले जाणारे एक
व्यासपीठ आहे. आणि एक खरी सार्वजनिक-खाजगी लोकांची भागेदारी(PPP) करण्याचे विचाराधीन आहे. आपल्या
शहरास डिजिटल, स्वच्छ, सुविधा पुणे मध्ये वेगाने परिवर्तीत करण्यासाठी पुण्याच्ये कॉर्पोरेटर्स नागरिक आणि स्थानिक
शासन यांच्या वैयक्तिक प्रयत्नाचा आणि लावण्यतेच्या चैतन्याचा पुरेपूर लाभ घेणे हा या व्यासपीठाचा उद्देश आहे.
पुणे सिटी कनेक्ट(PCC) मध्ये कॉर्पोरेट, सामाजिक जबाबदारीच्या (CSR) यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून या
दृष्टीकोणाची अंमलबजावणी करण्याची जबरदस्त क्षमता या उद्योगांमध्ये आहे असा आमचा विश्वास आहे ही क्षमता
कामाला लावण्यासाठी समान व्यासपीठ असावे असा आमचा उद्देश आहे. पुण्यात अस्तित्वात असलेले कॉर्पोरेटस त्यांच्या
वैयक्तिक कार्यक्षमते मध्ये लक्षात येण्याजोगे रीतीने सक्रीय आहेत. यावर आमचा विश्वास आहे. या प्रयत्नांमध्ये समन्वय
साधून या चांगल्या पद्धती द्वारे उपक्रमाचे सहनियोजन करून मोठ्या प्रमाणातील आणि शाश्वत प्रभाव पाडणे शक्य
होईल. पुढील काळामध्ये पुणे सिटी कनेक्ट(PCC) ची जबाबदारी डिजिटल स्वच्छ सुविधा पुणे पेक्षाही अधिक विस्तारित
याप्रसंगी उपस्थित विविध वृत्तपत्रांचे संपादक व विविध कंपन्याचे प्रतिनिधी यांनी शहरविकासाच्यादृष्टीने
भवितव्यात होणाऱ्या नियोजन व विकासकामा संदर्भात विविध प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला.
या प्रसंगी मा.स्थायी समिती अध्यक्षा सौ.अश्विनी कदम, विरोधी पक्ष नेते मा.अरविंद शिंदे, सभागृह
नेते मा.बंडू उर्फ शंकर केमसे, मा.बाबू वागस्कर, मा.अशोक हरणावळ, मा.महेंद्र पठारे शिक्षण मंडळ
अधिकारी बबन दहिफळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या श्रीमती किशोरी गद्रे, विविध वृतापत्राचे
मा.संपादक विविध कंपन्याचे प्रतिनिधी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे सिटी कनेक्ट च्या
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुची माथूर यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले व आभार मानले.


