मुंबई, दि. 30 : ज्येष्ठ कवी महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने
शब्द आणि भावनांच्या माध्यमातून मराठी रसिकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारा जादुगार काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात आमदार दिलीप वळसे- पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
श्री. वळसे – पाटील आपल्या शोकसंदेशात म्हणतात, साध्या शब्दात जीवनाचे सौंदर्य मांडणारे श्री. पाडगावकर हे प्रेम भावना कवितेतून व्यक्त करतांना तरुणाईच्याच भावनांना थेट हात घालत.
प्रेम, जीवन त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येकासाठी श्री . पाडगांवकर विचार करत होते. त्यांच्या कवितेनं प्रस्थापित व्यवस्थेविरोधातही कठोर प्रहार केले. सत्तरीच्या दशकातील त्यांची सलाम ही कविता हा त्यांच्यातल्या विद्रोही कविचा अविष्कार होता.
‘या जन्मावर , या जगण्यावर , शतदा प्रेम करावे, असे सांगणारे श्री. पाडगांवकर हे आयुष्यभर कविता, साहित्याची सेवा करत राहिले. अशा या शब्द आणि भावनांचा जादुगार काळाच्या पडद्याआड गेल्याने मराठी साहित्याचे अगणित नुकसान झाले आहे. अशा या कविवर्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.