पुणे-शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव यंदा रविवार, 1 मार्च रोजी होणार असून शनिवारवाड्याचे ऐतिहासिक आवार यानिमित्ताने पुन्हा एकदा झळाळून उठणार आहे. डॉ. संध्या पुरेचा आणि झेलम परांजपे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन रविवारी, 1 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता शनिवारवाड्याच्या भव्य प्रांगणात
होईल. दीप प्रज्ज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना श्री. उमा घोटगे व त्यांचे
सहकारी ‘गणेश वंदना’ सादर करतील. त्यानंतर ‘संकीर्तन’ हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतांच्या कथांचे
भरतनाट्यम शैलीत सादरीकरण समरचना नृत्यसंस्था सादर करतील. यानंतर ‘शिव शंकर’ हे शिव-पार्वतीच्या
जीवनातील निरनिराळ्या प्रसंगावर आधारित आकर्षक नृत्यरचना सादर होईल. हा कार्यक्रम डॉ. संध्या पुरेचा
आणि त्यांचे साथीदार भरतनाट्यम शैलीत तर झेलम परांजपे व स्मितालयचे पथक ओडिसी नृत्यशैलीत सादर
करतील.
रांका ज्वेलर्स आणि झेन्सार टेक्नॉलॉजीज हा कार्यक्रमाचेप्रायोजक असून वीकफिल्ड, मोर मिसची, रेडिओ वन आणि
प्युअर गोल्ड फाईन चॉकोले, समृद्ध जीवन हेसह प्रायोजक असतील. या महोत्सवाचेगोल्ड आणि सिल्व्हर पास पुणे
क्लब, डीव्हीडी एक्सप्रेस-औंध, दि ओ हॉटेल, बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्येयगृह येथे 1 मार्चपर्यंत अनुक्रमे 200 आणि 100 रुपयांना उपलब्ध आहेत.