शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मुळा रोड परिसरात काँग्रेस पक्षाचे
आमदार विनायक निम्हण यांनी मतदारांशी थेट संवाद साधून वैयक्तिक संपर्कावर
भर दिला.या संपर्क मोहिमेत येत्या 15 ऑक्टोबर रोजी
शंभर टक्के मतदान करा, असे आवाहनही आमदार निम्हण यांनी सर्वांना केले.
सोमवारी सकाळी 10.30 वाजता त्यांनी या परिसरात घरोघरी जाऊन
वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. या वेळी अनेक ठिकाणी त्यांचे घराघरांतून औक्षण
करण्यात आले.
आमदार निम्हण यांच्यासोबत बाळासाहेब अरगडे, विजू शेवाळे, पंडित
पुनरंगम, पिट्टू भट्टी, सदाशिव डांगे, संदीप खडसे, दत्तात्रय सहाणे, टिंकू दास,
प्रशांत भोगले, अमित पिल्ले, विजय गायकवाड, अशोक आल्लाट, सुनिल शेलार,
सुमित गायकवाड, आकाश माने, रमेश शेख आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित
होते. आमदार निम्हण यांनी अरगडे कॉर्नर येथे कार्यकर्त्यांना सूचना देऊन
आपल्या पदयात्रेला सुरुवात केली. सत्यम सोसायटी, लक्ष्मीनारायण कुंज
सोसायटी, इश्वर कृपा सोसायटी, दिपाली अपार्टमेंट आदी सोसायट्यांमध्ये जाऊन
नागरीकांशी वैयक्तिक संपर्क साधत पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. त्यानंतर
त्यांनी बौद्ध विहाराला भेट दिली. त्यानंतर आदर्शनगरमधील सर्व
गल्ल्यांमधील मतदारांची भेट घेतली. यावेळी नागरीकांनी विजयी करण्याचे
आश्वासन दिले. दरम्यान, शंकर मंदिरात जाऊन शंकराचे दर्शन घेतले.
याबरोबरच मयुरेश्वर गणपतीचेही दर्शन घेतले. सर्वच ठिकाणी निम्हण यांचे
स्वागत करण्यात आले. चहा-पानाचाही आग्रह धरला जात होता. तसेच
महिलांकडून औंक्षणही करण्यात आले. मुळारोडवरील शॉपिंग सेंटर, व्यावसायिक,
व्यापारी यांच्याही निम्हण यांनी भेट घेतली. नुकताच वीजेचा शॉक लागून मरण
पावलेल्या अतिश शिंदे या युवकाच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
सुमारे चार तास चाललेल्या या संपर्क मोहिमेत येत्या 15 ऑक्टोबर रोजी
शंभर टक्के मतदान करा, असे आवाहनही आमदार निम्हण यांनी सर्वांना केले.