इसेट, गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून सक्रीय सुरक्षेच्या बाबतीत जगात अग्रस्थानी असून, व्हॉट्सऍपचा वापर करणाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक चॅट्सवर सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षाविषयक सर्वोच्च सूचना युजर्सना देत आहेत. व्हॉट्सऍपने अलिकडेच घोषित केले आहे की त्यांचे ७०० दशलक्षहून अधिक सक्रीय सदस्य आहेत, आणि एका महिन्यात एकंदर ३० बिलीयन संदेश पाठवित असतात. वैयक्तिक माहिती पाठविण्याचं हे प्रमाण महाप्रचंड आहे, आणि व्हॉट्सऍप आपले सर्व संदेश आणि डेटा आता एनक्रीप्ट करत असले तरीही, आपल्या चॅट्सच्या बाबतीत सुरक्षित राहणे फायद्याचे ठरते. व्हॉट्सऍप सुरक्षेविषयक अत्यंत महत्वाच्या सूचना पुढे दिल्या आहेत.
व्हॉट्सऍप लॉक करणे
एक सर्वात उत्तम उपाय म्हणजे व्हॉट्सऍपला एक पासवर्ड किंवा पिनद्वारे सुरक्षित करणे. व्हॉट्सऍप स्वतःहून असा पर्याय देत नाही, परंतु काही तृतिय पक्षांचे ऍप्स अशी सुविधा देतात. हे कदाचित त्रासदायक वाटू शकते, परंतु आपला फोन हरवला तर, अन्य कोणी व्यक्ती आपल्या चॅट्स पाहू शकणार नाही. मेसेंजर आणि चॅट लॉक, लॉक फॉर व्हॉट्सऍप आणि सिक्युअर चॅट हे तीन अँड्रॉईड ऍप्स अशी सुविधा देतात.
व्हॉट्सऍप फोटोज फोटोरोलमध्ये येण्यास प्रतिबंध करणे
आपली व्हॉट्सऍपवरील संभाषणांचं स्वरूप काहीवेळेस अतिशय ‘वैयक्तिक’ होऊन जातं हे आपण सहजच समजू शकतो. आपण आपल्या महत्वाच्या व्यक्तिंसोबत इमेजेस शेअर करत असाल तर, त्या इमेजेस आपल्या सर्वसाधारण फोटोस्ट्रीम येऊ नयेत अशीच आपली इच्छा राहील, अन्यथा तुमचा मित्र तुमच्या हॉलीडे स्नॅप्समध्ये स्वाईप करताना ती त्याला दिसतील.
iPhone वर, हे सहजपणे करता येतेः आपल्या फोनच्या सेटींग्ज मेन्यूमध्ये जा, नंतर ‘प्रायव्हसी’, ‘फोटोज’, मध्ये जा आणि फोटोस्ट्रीममध्ये ज्यांच्या इमेजेस फीड होतात त्या ऍप्सच्या यादीतून व्हॉट्सऍप काढून टाका.
अँड्रॉईड युजर्सना थोडंसं बुरख्याखाली जावं लागेल. ES फाईल एक्स्प्लोररसारखं एखादं फाईल एक्स्प्लोरर ऍप वापरून, व्हॉट्सऍपचे ‘इमेजेस’ आणि ‘व्हिडीओज’ फोल्डर्स शोधा. प्रत्येकामध्ये ‘.nomedia’ नावाची एक फाईल तयार करा. म्हणजे अँड्रॉईडची गॅलरी त्या फोल्डरचे स्कॅनिंग करणे थांबवेल.
दुसरं, आपण आपल्या फोटोरोलमधून व्हॉट्सऍप इमेजेस वगळल्या, आणि ऍप वरीलप्रमाणे लॉक केले तर, तुमचा फोन चोरीला गेला किंवा हॅक झाला तर सुरक्षेचा आणखी स्तर पुरविला जातो – परंतु हा १०० टक्के सुरक्षित उपाय नाही.
‘लास्ट सीन’ टाईमस्टँप हाईड करणे
तुम्ही ऑन आणि ऑफलाईन केव्हा येता हे लोकांना कळले पाहिजे किंवा नाही याची खात्री नाही का? ही काही महत्वाची माहिती असणार नाही, परंतु एखाद्या स्कॅमरला तुमच्याबाबत काही गोष्टी आधीच माहिती असतील तर, संदर्भयुक्त माहितीचा हा शेवटचा धागा जोडण्यामुळे त्यांना उपयुक्त ठरू शकते – मग तुम्ही जागे असाल अथवा नाही; घरी असाल किंवा परदेशी; चित्रपट गृहाच्या बाहेर येत असाल किंवा विमानातून उतरत असाल. किंवा तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट्सना – विशेषतः सहकारी, किंवा तुमचा बॉस – तुम्ही तुमच्या डेस्कवर व्हॉट्सऍप चेक करत आहात हे माहिती होऊ न देण्याची इच्छा असेल. व्हॉट्सऍपच्या प्रोफाईलमध्ये तुमची ‘लास्ट सीन’ वेळ निष्क्रीय करू शकता किंवा ती कोण पाहू शकेल त्यावर निर्बंध घालू शकता; अँड्रॉईड, iOS, विंडोज किंवा ब्लॅकबेरीमध्ये ‘प्रायव्हसी’ मेन्यू. तरी लक्षात घ्या, की तुम्ही ते ऑफ केले तर, तुम्ही इतर युजर्सचे ‘लास्ट सीन’ वेळादेखील पाहू शकणार नाही.
प्रोफाईल चित्राचा ऍक्सेस निर्बंधित करणे
तुमच्या प्रोफाईलचा फोटो तुम्ही अन्यत्र वापरला आहे का – लिंक्डइन, फेसबुक किंवा ट्विटरवर? तो तुमच्या कंपनीच्या वेबसाईटवर देखील कुठेतरी असू शकतो. तसं असेल तर, तुमचे व्हॉट्सऍप शेअरींग सार्वजनिक राहील, तुम्ही ज्या कोणाशी बोलाल त्यांसाठी – मग तुम्ही एखाद्या अनावश्यक संदेशाला उत्तर दिले असले तरीही. – ते तुमच्या व्हॉट्सऍप प्रोफाईलवरून तुमचे चित्र डाऊनलोड करू शकतात, आणि गुगल इमेज सर्च वापरून, तुमच्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. प्रायव्हसी मेन्यूमध्ये प्रोफाईल पिक्चर शेअरींग “कॉन्टॅक्ट्स ओन्ली” असे शेअर करा.
स्कॅम्सबाबत दक्ष राहा
व्हॉट्सऍप कधीही या ऍपद्वारे तुमच्याशी स्वतःहून संपर्क साधणार नाही. तसेच, व्हॉट्सऍप चॅट्स व्हॉईस मेसेजेस पेमेंट बदल, फोटोज, किंवा व्हिडीओजबाबत ईमेल्स पाठवत नाही, आपण त्यांच्या मदत कक्ष आणि सपोर्टला इमेल केलेला असल्याखेरीज. कोणीही मोफत सबस्क्रीप्शनची ऑफर दिली, आणि व्हॉट्सऍपकडून आल्याचा दावा केला किंवा तुम्हाला तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी लिंक्स घेण्यास प्रोत्साहन दिले तर तो नक्कीच स्कॅम असेल आणि त्यावर विश्वास ठेवू नये.
तुम्ही तुमचा फोन हरवला तर व्हॉट्सऍप अकार्यान्वित करणे
तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुमचे खाते नियंत्रणात ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी सुरक्षाविषयक सूचना व्हॉट्सऍप युजर्सना देते. तुमच्या नेटवर्क पुरवठादाराच्या माध्यमातून तुमचे सीम कार्ड लॉक करण्यासोबतच. व्हॉट्सऍप शिफारस करते की तुम्ही सीम रिप्लेस करून अन्य फोनवरून त्याच फोनक्रमांकाद्वारे व्हॉट्सऍप कार्यान्वित करा. हे ऍप केवळ एका क्रमांकाद्वारे एकावेळी एका उपकरणावर वापरता येते, त्यामुळे असे करण्याद्वारे तुम्ही त्याचा वापर तुमच्या जुन्या फोनवर होण्यास तत्काळ प्रतिबंध घालू शकता. असे करणे शक्य नसेल तर, व्हॉट्सऍप तुमचे खाते अकार्यान्वित करेल.
तुम्ही काय बोलत आहात त्याबद्दल काळजी घ्या
शेवटी पण अत्यंत महत्वाचे म्हणजे, कोणत्याही डिजीटल कम्युनिकेशनबाबत आपण वापराल तसंच तारतम्य इथेही बाळगा. तुम्ही शक्यतो टाळू शकत असाल तर वैयक्तिक माहिती पाठवू नका – पत्ते, फोन क्रमांक, ईमेल पत्ते – आणि कधीही तुमचा बँक, सामाजिक सुरक्षा किंवा क्रेडीट कार्ड तपशील, किंवा तुमचा पासपोर्ट किंवा अन्य ओळखीचा तपशील पाठवू नका.