अभिनव कला विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी भरवले चित्र प्रदर्शन
पुणे:-सातारा,उस्मानाबाद,मुळशी मधून आलेल्या तरुणानी बालगंधर्व कलादालन येथे भव्य चित्र प्रदर्शन भरवले आहे.हे प्रदर्शन ४,५,६डिसेंबर सकाळी ९ ते ६ या वेळेत निशुल्क नागरिकांसाठी खुले आहे.
या चित्र प्रदर्शनामध्ये ग्रामीण जीवन, निसर्ग चित्रण, श्री गणेश पेंटिंग, समुद्रकिनार्यावरील बोटी, पुण्यातील रस्ते असे वेगवेगळे चित्र पाहण्यास मिळतात. तसेच या मध्ये अक्रालिक पेंटिंग,हँण्ड वर्क केले आहे.
पुणेकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा कला हि लोकांपर्यंत यावी व समाजाला नेमक काय आवडते हे ह्या तरुणानी समजून घेऊन चित्र बनवले आहेत.
तरुणानी हि कला अवगत करावी व या कले मधून समजला प्रबोधन करता येईल.कलाकार हा आपल्या कलेमधून आपल्या कल्पना सादर करतो.तसेच हे प्रदर्शन पुढे मुंबई,औरंगाबाद, कोल्हापूर येथे होणार असल्याचे विश्वनाथ खिलारी,सचिन भोरे, अनिल चव्हाण यांनी सांगितले


