पुणे- केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशावरूनच इंदिरा व राजीव गांधी यांची टपाल तिकिटे बंद करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे.याबाबत व्यर्थ आहे काय बलिदान यांचे असा सवाल करीत हेमंत बाजीराव मुळे यांनी हि तिकिटे बंद करू नये अशी कळकळीची मागणी केली आहे
टपाल विभागाने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात २००८ मध्ये नऊ महत्त्वाच्या व्यक्तींची छायाचित्रे असलेल्या टपाल तिकिटांची मालिका सुरू केली होती. त्यात इंदिरा व राजीव गांधी यांच्यासह महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, होमी भाभा, जेआरडी टाटा व मदर तेरेसा यांचा समावेश होता. नव्या मालिकेत आता उपाध्याय, नारायण, मुखर्जी व लोहिया यांच्याव्यतिरिक्त लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, भीमसेन जोशी, विवेकानंद, भगतसिंग, पं. रविशंकर आदींची छायाचित्रे असलेल्या टपाल तिकिटांचा समावेश असेल. गेल्या वर्षी केंद्र सरकारने इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार व राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान-विज्ञान मौलिक पुस्तक लेखन पुरस्कार या पुरस्कारांचे नामांतर अनुक्रमे राजभाषा कीर्ती पुरस्कार व राजभाषा गौरव पुरस्कार असे केले होते.‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ म्हणून सर्वाना गौरवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी इंदिरा व राजीव यांच्या तिकिटांची छपाई बंद करण्याचे आदेश टपाल विभागाला देण्यात आल्याचे ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जातून स्पष्ट झाले आहे.अशी बातमी प्रसिध्द झाली आहे .
दरम्यान या बातमीचा आधार घेत मुळे यांनी म्हटले आहे कि ,केंद्रात अनेक वर्षांनी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळून स्थिर सरकार आले आहे . देशाच्या प्रगतीमध्ये व जनतेच्या हितासंबंधी सरकार कडून काम होईल अशी अपेक्षा होती . परंतु या मोदी सरकारने जनतेचा अपेक्षा भंग केला . विधायक विकास कामे करण्या ऐवजी भारतीय इतिहासामध्ये स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या योगदानाची दखल घ्यावी लागेल . मा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारणापेक्षा इंदिरा गांधीनी दाखविलेल्या सन १९७१ मध्ये त्यांनी केलेल्या धाडशी कामाचे कौतुक करून साक्षात इंदिरा गांधी यांना दुर्गाची उपमा दिली . ऑपरेशन ब्लू स्टारच्या आदेशावर सही करताना राष्ट्रहिताचा विचार करून मी माझ्या मृत्यूच्या आदेशावर सही करत आहे . तसेच राजीव गांधी यांना श्रीलंकेत प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा आपले कार्य सुरूच ठेवले . थोडक्यात देशाच्या हिताकरिता दोघांनीही बलिदान दिले आहे .भारतीय जनता पार्टी ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असणारे व्यक्तींचा आपल्याला सत्तेच्या माध्यमातून त्यांना हद्दपार करत आहे . त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सकारात्मक कामे करावीत नकारात्मक कामे करून आपला विश्वास गमावू नये .