Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘वॉल ई’ साय-फायपटाची कमाल झी टॉकीजवर

Date:

unnamed

 

झी टॉकीजने बच्चेमंडळीसाठी आणलेल्या डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चित्रपटांच्या खास भेटीतून मनोरंजन आणि अंजन अशा दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद झी टॉकीजच्या या डिस्ने चित्रपट महोत्सावाला मिळत आहे. येत्या रविवारी ३१ मे ला  दुपारी १२ वाजता व सायं ६ वाजता दाखवण्यात येणाऱ्या  ‘वॉल ई’ या साय-फायपटातून ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवर आणि तिथे राहणाऱ्या सजीवांवर होणाऱ्या परिणामांचे वास्तवकारी चित्रण पाहायला मिळेल.

 

‘वॉल ई’ या साय-फायपटात सध्याच्या वातावरणाचे चित्रण दाखवले आहे. ‘वॉल ई’ व ‘इव्हा’ या दोघांची ही कथा आहे. पृथ्वीतलावरील दूषित वातावरणात माणसांना राहणे अशक्‍य होते. त्यामुळे समस्त पृथ्वीवासी दुसऱ्या ग्रहावर वस्ती करण्यास गेले आहेत. पृथ्वीवर सर्वत्र गगनचुंबी कचऱ्यांचे ढीग आहेत. केवळ झुरळ वगळता सजीवांचा मागमूस शिल्लक नाही. परग्रहावर जाताना मानव जातीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘वॉल ई’ नामक यंत्रमानव ठेवला आहे. या घटनेला 700 वर्षे उलटतात यानंतर  एका मिशन वर आलेल्या ‘इव्हा’ ची ओळख ‘वॉल ई’  शी होते. ‘कुठेही मातीचा कण व रोपटे आढळल्यास ते घेऊन ये. असा आदेश ‘वॉल ई’ च्या मैत्रीण ‘इव्हा’  ला दिला असतो. ‘वॉल ई’ ची मैत्रीण असलेल्या ‘इव्हा’ ला एके दिवशी एक रोपटे दिसते. पृथ्वीतलावर आता बीजांकुरण होऊ शकते ही बातमी व तिचा पुरावा घेऊन ‘इव्हा’  मानवी वस्ती असलेल्या ग्रहावर जाते. या मिशन नंतर ‘वॉल ई’ व ‘इव्हा’  दुसऱ्या  आकाश गंगेत जातात. माणसाच्या वर्तनामुळे हवा, पाणी व जमीन दूषित आहे. जीवसृष्टीची भरून न येणारी हानी होत आहे. या विनाशामुळे येऊ घातलेला धोका ‘वॉल ई’ चित्रपटात दाखवला आहे.

 

झी टॉकीज महाराष्ट्रातील मराठी चित्रपट रसिकांची खास जिव्हाळ्याची चित्रपट वाहिनी असून गेल्या काही वर्षातच या वाहिनीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. मराठी चित्रपटांचा मूल्यवान खजिना झी टॉकीज वाहिनीने जपला आहे. या चित्रपटांना रसिकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद दिलाय. रसिकांनी दिलेल्या या भरभरून प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना झी टॉकीज ने मनोरंजनाचे अनोखे नजराणे पेश केले आहेत. झी टॉकीजच्या या नित्य नव्या प्रयत्नांना रसिकांनीही  खूप उचलून धरले आणि म्हणूनच मनोरंजनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी झी टॉकीजला सतत प्रोत्साहन मिळत आले. याच उत्साहातून अनेक गाजलेले चित्रपट, अनेक क्लासिक चित्रपटांचे महोत्सव, कॉमेडी चित्रपटांची जत्रा यासोबतच सिनेताऱ्यांच्या भेटी किंवा चित्रसृष्टीचे दैदीप्यमान सोहळे रसिकांना घरबसल्या अनुभवता आले.

 

वैविध्यपूर्ण मनोरंजनाची ही वैभवशाली परंपरा जोपासत झी टॉकीज या सुट्टीत आपल्या छोट्या दोस्तांसाठी एक खास आश्चर्यकारक भेट घेऊन दाखल झाली आहे. अॅनिमेशन चित्रपटांची ही जादुई दुनिया केवळ छोट्या मित्रांसाठीच नव्हे तर कुटूंबातल्या प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरली आहे. झी टॉकीजवरील या चित्रपटांमुळे छोट्या दोस्तांची यावेळची सुट्टी आणखीनच बहारदार झाली आहे. मनोरंजनाचा हा आगळा वेगळा धमाका झी टॉकीजच्या आजवरच्या प्रवासातला आणखी एक परमोच्च बिंदू ठरेल अशी आशा आहे. असे झी टॉकीज चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले.

 

डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चे चित्रपट प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्याप्रमाणात वितरीत करण्यासठी डिस्ने आणि डिस्ने पिक्सार ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन ने आजवर आपले सर्वाधिक कार्यक्रम वेगवेगळ्या  भाषांमध्ये प्रसारित केले आहेत. डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन चे १३,००० प्लॅटफॉर्म पार्टनर २४० प्रभागात हे कार्यक्रम जगभरात प्रसारित करतात. डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन भारतातल्या वेगवेगळ्या वाहिन्यांबरोबर काम करते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...