पुणे-पुणे-वैकुंठ स्मशानभूमीतील प्रलंबित कामे १५ मार्च पूर्वी पूर्ण करून इतर
समस्यांचे ही कायमस्वरूपी निराकरण करू असे वचन म न पा चे भवन विभागाचे
अधिक्षक अभियंता राजेंद्र राउत यांनी दिले.ते आज वैकुंठ स्मशानभूमीतील
प्रलंबित कामांची व अन्य समस्यांची पहाणी केल्यानंतर बोलत होते.वैकुंठ
मधील समस्यांबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे भाजप चे
सरचीटणिस संदीप खर्डेकर यांच्यासह कार्यकारी अभियंता संदीप
खांडवे,कनिष्ठा अभियंता हांडे व अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित
होते.यावेळी प्रामुख्याने खालील कामे १५ मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे
निश्चित करण्यात आले-
१) वैकुंठातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे काम (कॉंकरीटीकरण करणे )
२) विद्युत दाहिनी समोरील झाडांचे पार तसेच विसाव्याचे ओटा दुरुस्त
करणे/डागडुजी करणे.
३) विद्युतदाहिनी मधील अस्थी गोळा करण्याच्या ठिकाणी कुंपण घालणे तसेच
तेथील शेड चे गळके पत्रे बदलने.
४) सध्या सुरु असलेले कॅन्टीन,रिसेप्शन इमारत,स्वच्छतागृह,वाचमन केबिन व
दहन क्रिया शेड चे बांधकाम ही १५ मार्च पूर्वी पूर्ण करून त्यांचा वापर
सुरु करणे.तसेच रिसेप्शन इमारतीत पास देण्याची व्यवस्था करण्यास ही
मान्यता देण्यात आली.या इमारतीत अंत्यविधि करणारे गुरुजी,न्हावी तसेच
कर्मचार्यांना विश्राम घेता यावा अशी व्यवस्था असेल.
५) ज्या मोकळ्या जागेत अनेक सन्माननीय व्यक्तींचे दहन केले जाते ती
संपूर्ण जागा थाक ठीक करणे व तेथे नागरिकांना बसण्यासाठी तयार करण्यात
येणारी व अर्धवट बांधकाम झालेली इमारत पुढील बजेट तरतूदीतून पूर्ण करणे.
६) पुढील बजेट तरतूदीतून आणखी दोन विद्युत दाहिण्या उभारणे.
७) वैकुंठ च्या मागच्या बाजूस दोन जुनी बांधकामे असून त्यांचा प्रेमी
युगल व मद्यापिंकडून गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे ही
बांधकामे पाडून टाकावीत असे ही निश्चित करण्यात आले.
याव्यतिरिक्त वैकुंठ च्या मागील बाजूस नदीत राख टाकण्यात येते (लाकडा
वरील अंत्यसंस्कारा नंतर सावडण्याचा विधि झाल्यावर उरलेली रक्षा ) हे
सर्वथा गैर असून यातून नदीतील प्रदुषण वाढत असून हे त्वरित थांबवावे व
यावर कायम स्वरूपी पर्याय शोधावा अशी मागणी ही श्री.खर्डेकर यांनी केली
आहे.मात्र हे काम भवन अंतर्गत येत नसल्याने याबाबत आयुक्तंकडे पाठपुरावा
करणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
तसेच स्मशाणभूमीच्या आवारात कॅन्टीन च्या उभारणीस माझा व्यक्तीश: पाठिंबा
असून याचा उपयोग मयता ची वाट बघणारे आप्तेष्ट,बाहेर गावाहून अंत्यविधि
साठी येणारे नागरिक,रात्री अपरात्री येणारे नागरिक यांना व्हावा व येथे
माफक दरात सेवा मिळावी.जागरूक पुणेकर स्मशान भूमीत कॅन्टीन हा विषय कसा
स्वीकारतात याचा प्रशासनाने चाचपणी करूनच हे कॅन्टीन सुरु करावे असे ही
संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले आहे.एकूणच वैकुंठ पुढील महिन्यापासून
काट टाकेल व पुणेकरांना अधिक सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास आजच्या
निर्णयांवरून वाटत असल्याचे ही खर्डेकर यांनी सांगितले.