शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल 2015’ ला चांगला प्रतिसाद
पुणे :
‘वळू ‘ ही समाजातील वेगवेगळ्या स्वरूपातील दावी सोडवू इच्छिणाऱ्या उन्मुक्त वृत्तीचे प्रतिबिंब आहे .,तर ‘विहीर ‘ मध्ये पौगंडावस्थेतील मुलांची अवस्था मांडणारा चित्रपट असल्याने विशेष कौतुक झाले , ‘देऊळ ‘ मध्ये श्रद्धा विकायला निघालेल्या समाजाचे प्रतिबिंब असल्यानं भावला ,मात्र प्रत्येक चित्रपटात संकल्पना संहिता चांगली असेल तरच यश आणि समाधान मिळते ‘ ,असे प्रतिपादन अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी केले
मुक्त अर्थव्यवस्थेचे स्थित्यंतर देऊळ मध्ये पडले ,त्याच बरोबर ग्रामीण भागावर झालेला चुकीचा परिणाम या चित्रपटात लोकांना दिसला . प्रत्येक गोष्टीची दुकानदारी मोडून काढण्याचा विचार यात होत्या ,त्यामुळे धमक्याही आल्या . देव प्रत्येकाचा वेगळा असतो ,मीही तो अनेक ठिकाणी शोधतो ,मात्र त्यासाठी मंदिरात जावे लागतेच असे नाही . श्रद्धेचे पेकेजेस धार्मिक ठिकाणी झालेली आहेत ,त्याचा बाजार होणे गंभीर आहे . ज्या श्रद्धा वेठीस धरून राजकारण ,बाजार होतो ,त्या श्रद्धाच विसर्जित केल्या पाहिजेत ,त्या ऐवजी मानवी मूल्यांचे जतन व्हायला हवे
उमेश कुलकर्णी आणि माझी जोडी निंदकाचे घर वाढीला पोषक ठरणारा आहे असेही ते म्हणाले
‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ आणि ‘व्यंकटेश्वरा हाऊसिंग ग्रुप’ या संस्थांच्यावतीने पिरंगुट येथे ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ या दोन दिवसीय सांस्कृतिक, कला व चित्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . त्यात वरदा जाधव यांनी गिरीश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला .
शनिवार 25 जुलै व रविवार 26 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पिरंगुटच्या निसर्गरम्य परिसरात सांस्कृतिक, कला व चित्र तसेच रॅपलिंग, झिपलाईन सारख्या विविध साहसी खेळांचे या उत्सवात आयोजन करण्यात आले होते
आषाढी वारीनिमित्त भजनाच्या कार्यक्रम ,गायिका सायली पानसे आणि अपर्णा केळकर यांचा ‘अमृतघन’ हा वर्षाऋतु वरील संगीताचा कार्यक्रम सादर केला .
, चारुहास पंडीत यांनी ‘चिंटू गँग’ ची स्केचेस रेखाटली . ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ या उत्सवाला आबाल वृद्धांचा चांगला प्रतिसाद

