पुणे :
वृक्ष प्राधिकरणा वरील सदस्य नियुक्ती प्रकरणी पुणे मनपाच्या वृक्ष प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याच्या याचिकेवर ३१ जानेवारी पूर्वी आयुक्त आणि वृक्ष अधिकाऱ्याने प्रतिज्ञा पत्राद्वारे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे .
पुण्यातील वृक्षप्रेमी दीपक वहिकर,विनोद जैन ,वैभव गांधी यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे . . ए एस ओक आणि ए के मेनन यांच्या खंडपीठाने निर्णय दिला . दीपक वहिकर,विनोद जैन ,वैभव गांधी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याबद्दल ची जनहित याचिका दाखल केली होती . ६ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी आणि अंतिम निकाल होईल . एड राहुल बोरा आणि हर्षद मांडके यांनी जैन यांच्या वतीने बाजू मांडली
पुणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर १५ सदस्यांची समिती करावी ,त्यातील सात नगरसेवक शास्त्र विषय पदवीधर असणाऱ्यांना प्राधान्य द्यावे ,विशेष ज्ञान असलेल्या सदस्यांना घ्यावे, अशासकीय संस्था सामाजिक वनीकरण मध्ये नोंदलेल्या घ्याव्यात हे ३ महत्वाचे आदेश २० सप्टेबर २०१३ ला उच्च न्यायालयाने दिले होते. हे तीन आदेश डावलून पालिकेने २७ सदस्यांचे वृक्ष प्राधिकरण तयार केले केले . त्यात अपात्र सस्न्था पदाधिकारी आणि सदस्यांची भरती बेकायदेशीर रित्या केली .