महावितरणचे सहकार्याचे आवाहन
मुंबई:- पावसाने मारलेली दडी, वातावरणातील उकाडा-उष्णता, ग्राहकांचा वाढता वीजवापर,
कृषिग्राहकांची वाढती मागणी यासर्व कारणांमुळें आजही राज्यात विजेची मागणी सुमारे 16,500 मे.वॅ. इतकी प्रचंड
वाढली आहे. विजेची उपलब्धता 15,000 ते 15,500 मे.वॅ. असल्याने वीज यंत्रणा वाचविण्यासाठी नाईलाजास्तव आज
दुसर्या दिवशीही सर्वच गटांमध्ये काही तासांचे अघोषित भारनियमन करण्यात आले.
महानिर्मितीने आज चंद्रपूर येथील 500 मे.वॅ.चा संच सुरूं केल्यामुळें महानिर्मितीच्या वीज उपलब्धतेत 4,055
मे.वॅ. एवढी वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळांला. पाण्याअभावी परळी येथील 1,130 मे.वॅ. विजेची निर्मिती बंद आहे.
पवन ऊर्जेतून अपेक्षित असलेल्या 2,000 मे.वॅ. विजेमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊन तेथून आता केवळं 500 ते 600
मे.वॅ. वीज मिळंत आहे. अदानी पॉवरचा संच क्र. 4 (660 मे.वॅ.) हा तांत्रिक बिघाडामुळें बंद आहे. तसेच कोयना
प्रकल्पाचा टप्पा क्र. चार मधील एक संच (250 मे.वॅ.) तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. हे भारनियमन आटोक्यात
आणण्यासाठी कोयना येथून सध्या 1,500 मे.वॅ. विजेची निर्मिती होत आहे. याशिवाय पॉवर एक्सचेंजमधून
महावितरणने आजही 1,000 ते 1,200 मे.वॅ. वीज काही तासांसाठी विकत घेतली आहे.
ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मिळेंल त्या सर्व स्त्रोतांमधून जास्तीत जास्त वीज उपलब्ध करण्याचा महावितरण
प्रयत्न करीत आहे. ही परिस्थिती उद्यापर्यन्त पूर्वस्थितीवर येण्याची शक्यता आहे. असे असूनही महावितरणने कृषिपंपाचे
भारनियमन न करण्याची दक्षता घेतली असून त्यांना निर्धारीत तासांचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. जनतेने
महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दिलासा : दोन टप्प्यात सव्वा तासांचे भारनियमन-
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात बुधवारी (दि. 14) ‘अ’ गटातील 340 वाहिन्यांवर दोन टप्प्यात 1 तास
20 मिनिटांचे तात्पुरते भारनियमन करण्यात आले. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भारनियमनाच्या वर्गवारीनुसार ‘अ’
गटात एकूण 425 वाहिन्या आहेत. यातील 161 वाहिन्यांवर सकाळी 9.40 ते 10.45 दरम्यान 1 तास 05 मिनिटांचे
भारनियमन करण्यात आले. तर दुपारी 14.30 ते 14.45 या कालावधीत 179 वाहिन्यांवर 15 मिनिटांचे भारनियमन
करण्यात आले. याशिवाय ‘ब’ गटातील 12 वाहिन्यांवर 11 मिनिटे ते 2 तासांपर्यंत चक्राकार पद्धतीने भारनियमन
करण्यात आले. दुपारी 14.45 नंतर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तात्पुरते भारनियमन मागे घेण्यात आले.