पुणे : वीजबचतीसाठी उपयुक्त असलेल्या एलईडी बल्ब खरेदीमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहर राज्यात सोमवारी (दि. 14) अव्वल क्रमांकावर आले. तब्बल 10 लाख 31 हजार 169 एलईडी बल्बची वीजग्राहकांकडून खरेदी करण्यात आली आहे.
केवळ 45 दिवसांच्या कालावधीत पुणेकरांनी वीज बचतीसाठी पुढाकार घेत एलईडी खरेदीत राज्यात सोमवारी आघाडी घेतली व राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिनाच्या दिवशीच राज्यात अव्वल क्रमांक गाठला, हे उल्लेखनीय.
केंद्ग सरकार पुरस्कृत डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्राम () अंतर्गत एनर्जी एफिशियंसी सर्व्हीसेस लिमिटेडच्या (ईईएसएल) या कंपनीकडून महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना प्रत्येकी 10 एलईडी बल्ब वितरणाच्या योजनेला पुणे शहरात सुरवात झाली आहे. सद्यस्थितीत पुणे शहरात 55 ठिकाणी एलईडी बल्ब वितरण केंद्ग सुरु आहेत. तसेच पिंपरी चिंचवड शहरात 9 तर ग्रामीण भागात 6 ठिकाणी एलईडी बल्बचे वितरण केंद्ग सुरु झालेले आहेत. पुणे परिमंडलात टप्प्याटप्प्याने वितरण केंद्ग वाढविण्यात येत आहेत.
राज्यात सोमवारपर्यंत एकूण 58 लाख 97 हजार 942 एलईडी बल्बची विक्री झाली होती. यात पुणे शहर व लगतच्या ग्रामीण भागातून 10,31,169 एलईडी बल्ब खरेदी करण्यात आले होते. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. यातील 1011812 बल्ब रोखीने तर 19357 बल्ब हप्त्यांनी (ईएमआय) खरेदी करण्यात आले आहेत.
या योजनेतून प्रत्येक घरगुती वीजग्राहकाला प्रत्येकी 7 वॅटचे एकूण 10 एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार आहे. 100 रुपयांचा एक बल्ब असे एकूण 10 बल्ब रोक्ष्ख रक्कमेतून एकाच वेळी खरेदी करता येईल. यात हप्त्यांची योजना असून वीजग्राहकांना 10 पैकी जास्तीत जास्त 4 एलईडी बल्ब हे प्रत्येकी 10 रुपये अॅडव्हॉन्स भरून खरेदी करता येईल व या 4 बल्बची उर्वरित रक्कम 10 हप्त्यांत वीजदेयकातून भरावी लागणार आहे. एलईडी बल्बची तीन वर्षांची वारंटी असून वारंटी पिरेडमध्ये नादुरुस्त झालेला बल्ब बदलून मिळणार आहे. एलईडीचा एक बल्ब रोखीने शंभर रुपयाचाच आहे व बल्बची खरेदी केल्यानंतर त्याची वीजग्राहकांनी पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवारी 15 ग्रामंचायतींमध्ये
महावितरणचा त्रिसुत्री कार्यक्रम
मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागातील आयोजन
पुणे: महावितरणच्या पुणे परिमंडलातील मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागात गुरुवारी (दि. 17) त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विभागातील 15 ग्रामपंचायतींमध्ये मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, तक्रारीनुसार वीजदेयकांची व आवश्यकतेनुसार यंत्रणेची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे.
मुळशी विभागातील फुरसुंगी (हडपसर ग्रामीण), उरुळीकांचन (उरळीकांचन), पौड (मुळशी), खेड (नसरापूर), राजगुरुनगर विभागातील कामशेत (वडगाव), शिरोळे (राजगुरुनगर) भांबोरी (चाकण), इंदोरी (तळेगाव) आणि मंचर विभागातील पिंपळगाव खडकी (मंचर), वडगाव खुर्द (घोडेगाव), उंचखडक (आळेफाटा), देवळे, निमगिरी, खैरे खराळे (जुन्नर) व येडगाव (नारायणगाव उपविभाग) या 15 ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 17) त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत दिवसभरात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, वीजयंत्रणेची व नागरिकांच्या तक्रारीनुसार वीजदेयकांची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे. संबंधीत ग्रामपंचायतीमधील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.