पुणे: वीजयंत्रणेवर काम करताना अनावधानाने झालेला वीजअपघात जीवावर बेतू शकतो. काही क्षणांत होणारे
नुकसान भरून काढता येत नाही. त्यामुळे वीजयंत्रणेचे काम करताना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी केले.
महावितरणच्या सेनापती बापट मार्गावरील लघुु प्रशिक्षण केंद्गात वीजसुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित तीन
दिवसीय वीजसुरक्षा प्रबोधन व प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ झाला. यावेळी मुख्य अभियंता श्री. मुंडे बोलत होते. कार्यक्रमाला
प्रमुख वक्ते म्हणून विद्युत निरीक्षक श्री. संजय देवगीकर तसेच अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. सुंदर लटपटे,
कार्यकारी अभियंता श्री. आनंद रायदुर्ग, सहाय्यक विद्युत निरीक्षक अनघा पुराणिक, नितीन सूर्यवंशी यांची उपस्थित होते.
मुख्य अभियंता श्री. मुंडे म्हणाले, की सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा व विजेच्या विविध उपकरणांपासून
प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. विजेचा अपघात घडल्यास परिणाम जिवघेणे असतात. त्यामुळे वीजयंत्रणेचे काम
करताना महावितरणचे जनमित्र, अभियंता यांनी वीजसुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. याशिवाय नागरिकांनी विजेची
विविध उपकरणे हाताळताना योग्य काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्युत निरीक्षक श्री. संजय
देवगीकर यांनी वीजसुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहीर, सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता श्री.
मनोहर कोलते, लघु प्रशिक्षण केंद्गाचे समन्वयक श्री. नवीन वैद्य आदींसह अभियंता, अधिकारी, जनमित्र उपस्थित होते.
दरम्यान, वीजसुरक्षा सप्ताहानिमित्त महावितरण, उर्जा विभाग, विद्युत निरीक्षक व इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टर असोशिएशन
(इकॅम) यांनी संयुक्तपणे सोमवारी (दि. 11) सकाळी 9 वाजता वीजसुरक्षा रॅलीचे आयोजन केले होते. शनिवारवाडा व
मंडई परिसरात जनजागृती करीत निघालेल्या या रॅलीत शेतीतज्ज्ञ श्री. बुधाजीराव मुळीक, महावितरणचे मुख्य अभियंता
श्री. रामराव मुंडे, विद्युत निरीक्षक श्री. संजय देवगीकर, अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. सुंदर लटपटे, इकॅमचे
अध्यक्ष श्री. सुनील गायकवाड, सचिव श्री. अमर पाटील आदींसह महावितरणचे सुमारे 250 अभियंता, अधिकारी,
कर्मचार्यांनी सहभागी होऊन वीजसुरक्षेबाबत नागरिकांचे प्रबोधन केले. यावेळी पथनाट्याद्वारेही वीजसुरक्षेबाबत संदेश
देण्यात आला.