उल्हासनगर /पुणे :
नाल्यातून वाहून आलेल्या अज्ञात पदार्थांमुळे निर्माण झालेल्या विषारी वायुमुळे उलट्या,डोखेदुखी ,अस्वस्थ वाटणाऱ्या २०० हून अधिक पिडीत रुग्णांना राज्य सरकारच्या महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्विस (एम ई एम एस) या रुग्णवाहिका सेवेने रुग्णालयात दाखल करून वेळीच उपचार उपलब्ध करून दिले .सर्वांची प्रकृती स्थिर आहे
महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्विस चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ ज्ञानेश्वर शेळके आणि ठाणे झोनल हेड डॉ विनय यादव यांनी हि माहिती दिली . शनिवारी सकाळी उल्हासनगर क्याम्प ४,साधू वासवानी नगर येथे हा प्रकार घडला . माहिती मिळताच ४ रुग्ण वाहिकांनी तातडीने पोचून वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली . रुग्णांना उल्हासनगर सेन्ट्रल हॉस्पिटल आणि नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले . एम ई एम एस च्या डॉ सस्मित जयस्वाल आणि टीमने यात मदतकार्य केले