पुणे-विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलची लढतहोती . ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करीत 329 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवलेहोती दरम्यान पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात सामन्यादरम्यान बेटिंग केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच सट्टेबाजांना अटक केली आहे. पिंपरी पोलिसांनी पाच आरोपींकडून 50 हजार रूपये रोख व 6 मोबाईल जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकुमार लालचंद रामरखियानी, निलेश ऊर्फ निलु रामरखियानी, आशीष भास्कर मोरे (27), लाल लखीचंद मोटवाणी (28) आणि राम सुखमल चौथानी (46 ) यांना अटक करण्यात आली आहे.
पिंपरीतील अशोक थिएटरजवळ आजच्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान बेटिंग सुरु असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा मारला

