मुंबई : मुंबईहून मस्कतला जाणार्या इंडिगो विमानातील स्वच्छतागृहात १ कोटी ४९ लाख रुपयांचे सोने सीमाशुल्क विभागाने हस्तगत केले आहेत. या विमानातून मोठय़ा प्रमाणात सोन्याची तस्करी होणार असल्याच्या माहितीवरून मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही. दुबईहून मस्कतला निघालेले इंडिगो कंपनीचे ६ ई ८१ हे विमान कोलकाता- मुंबईमार्गे मस्कतला जाणार होते. मात्र या विमानातून मोठय़ा प्रमाणात सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मुंबईच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांना मिळाली होती. ही माहिती कोलकाता सीमा सुरक्षा विभागाला देण्यात आली. कोलकाता विमानतळावर या विमानाची झडती घेण्यात आली. मात्र वेळेत हे विमान मुंबईला रवाना करायचे असल्याने सीमाशुल्क विभागाने विमानात काही न आढळल्याचे मुंबई विमानतळावरील अधिकार्यांना कळवले.
हे विमान मुंबई विमानतळावर दाखल होताच सीमाशुल्क अधिकार्यांनी विमानाच्या कसून तपासणीला सुरुवात केली. अखेर विमानातील तीन स्वच्छतागृहांतील बेसिनच्या मागे ६ किलो सोन्याच्या लगडी चिकटवून ठेवल्याचे आढळले. अधिकार्यांनी हस्तगत केलेल्या सोन्याची किंमत
१ कोटी ४९ लाख रुपयांएवढी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही