शिवाजीनगर मतदारसंघात ‘काम करणार्यास मत’ या विचारांचे वारे मतदारसंघात वाहत आहे. मतदारसंघातील
हजारो ज्येष्ठ नागरीक, महिला,युवा वर्ग, खेळाडू, असे सारेच घटक ‘काम करणार्यास मत’ ही भावना व्यक्त करीत जाहीर पाठिंबा देत आहेत, याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आपल्या मतदारसंघाबरोबरच पुण्याचे महत्त्वाचे प्रश्नही मार्गी लागण्यासाठी निवडून आल्यानंतर मी जोरदार प्रयत्न करीन. आणि त्यासाठीच पुन्हा एकदा आपली बहुमोल साथ मला द्याल, असे भावनिक आवाहन
शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेस -पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी व्क्त केले.
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी त्यांनी दुचाकी रॅली काढली
ही रॅली मातंग मेळाव्यानंतर काँग्रेस भवन येथून सुरु झाली. ती शिवाजीनगर गावठाणातून बालगंधर्व मार्गे पुलाचीवाडी, प्रभात रोड, लॉ कॉलेज रस्त्याने फर्ग्युसन रस्ता, घोले रस्त्याने, पीएमसी कॉलनी, पांडवनगर, पत्रकारनगर, चतु:शुंगी, रेंजहिल येथून खडकी, औंधगाव येथून डीपी रस्त्याने परिहार चौक, बोपोडी गावठाण, वाकडेवाडी, शिवाजीनगर, कामगार पुतळा, पाटील इस्टेट मार्गे संगमवाडी, रामनगर येथे विसावली. जागोजागी नागरीकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी विनायक निम्हण यांच्याबरोबर रॅलीत आमदार दिप्ती चवधरी, सौ. निम्हण, उमेश वाघ, मुकारी अलगुडे, मनिष आनंद, सुरेश कांबळे, सुरेश कांबळे, कमलेश वायकर, राजेंद्र भुतडा, बंडू चव्हाण, संजय खडगे, अभय सावंत आदी सहभागी झाले होते.