पुणे- शिक्षण मंडळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यानी कर्वेनगर च्या सम्राट अशोक विद्यालयात आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार मेधा कुलकर्णी यांच्यातील शिक्षकाचा उपस्थिताना प्रत्यय आला.वृक्षारोपण करतानाच विध्यार्थ्याना स्थानिक वृक्षांची माहिती दिली.तसेच पर्यावरणाची हानी,वारंवार कोपणारा आणी लहरी निसर्ग आणी त्यामुळे बदललेले रुतुचक्र याचे उत्तम विवेचन करताना प्राध्यापक मेधा कुलकर्णी यानी विध्यार्थ्याना शिक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणाचे धडे दिले.तसेच शाळेच्या परिसरात लावलेल्या या रोपांचे जतन करा असे ही आवर्जुन सांगितले.गारपीट,अवेळी येणारा पाउस,दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ याच्या मुळाशी आपण पर्यावरणाचा जो नाश करतो तेच कारणीभुत असुन त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर ही होतो हे ही त्यानी नमूद केले.या कार्यक्रमात जिल्हा स्तरावर बोक्सिंग स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळविणारया बाबु कंद्कुर या विध्यार्थ्याचा व त्याच्या आई चा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमा मागची भुमिका विषद करताना संयोजक मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या “या शाळे चे मोठे मैदान आहे,हे मैदान स्वच्छ रहावे याला भिंत घालावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.मात्र त्याच बरोबर या मैदानात सभोवती झाडे बहरल्यास त्याचा पुढील पिढीस फायदाच होइल हे जाणुन येथे 32 रोप लावण्यात आली आहेत.या व्रुक्षांची योग्य निगा राखली जाईल असे ही त्यानी आश्वस्त केले.
यावेळी स्थानिक नगरसेविका सुरेखाताई मकवान,शिक्षण मंडल सदस्य बाबा धुमाळ.श्री.जयंत भावे,प्रशांत हरसुले,जगन्नाथ कुलकर्णी,कुलदीप सावळेकर,भारत शिर्के,तात्या बालवडकर,सोमनाथ गुंड,रामदास गावडे,अमोल डांगे,रितेश वैद्य,माजी नगरसेवक शिवराम मेंगडे,दिलीप उंबरकर इ मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन आणी प्रास्ताविक सौ.मंजुश्री खर्डेकर यानी केले,तर मुख्याध्यापिका सुनंदा जाधव यानी स्वागत आणी बिडकर सर यानी सूत्र संचालन केले.