विद्यापीठ -औंध रस्त्यावरील झाडे वाचविण्यासाठी पाहणी
पुणे :
पुणे विद्यापीठ -औंध रस्त्यावरील रस्ता रुंदीकरणासाठी झाडे कापण्याच्या संदर्भात अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थाबरोबर आज महापौर दत्ता धनकवडे ,खासदार अनिल शिरोळे ,पालिका उप आयुक्त राजेंद्र जगताप यांनी प्रत्यक्ष पाहणी केली .
यावेळी पाहणी करून ,आराखडा पाहिल्यावर आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलल्यानंतर महापौरांनी जास्तीत जास्त झाडे वाचवून बाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन दिवसात बैठक घेण्याचे जाहीर केले . तर आजही पर्यायी आराखडा तयार नसल्याबद्दल खासदार अनिल शिरोळे यांनी उपायुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे नाराजी व्यक्त केली . शहर अभियंता विवेक खरवडकर ,श्रीनिवास बोनाला हे अधिकारी अनुपस्थित असल्याबद्दल संस्था प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली
मंगळवारी सायंकाळी सर्वांनी पाहणी केली आणि चर्चा केली
स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका पुन्हा मांडली . झाडे कापून वाहतूक कोंडी सुटत नाही ,त्यापेक्षा सर्वकष वाहतूक आराखडा तयार करून ,औंध रस्त्यावर सिग्नल वाढविण्यासारख्या उपायांची मागणी केली . चुकलेल्या फ्लाय ओव्हर कडे लक्ष वेधले
सुजित पटवर्धन ,प्रशांत इनामदार ,माधवी राहिरकर ,माधवी पाटकर ,दीपक बिडकर यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते