सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना आज पाठविलेले पत्र जसेच्या तसे येथे देत आहोत
——————————–
प्रती , दिनांक – २६ मे २०१५
श्री.कुणाल कुमार
आयुक्त, पुणे महानगरपालिका
पुणे
विषय – भष्टाचाराबाबतची आपली अनमोल वचने
महोद्य
मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात आपण ’शहराचा आर्थिक विकास होत असेल तर भ्रष्टाचाराचा बाउ करण्याची आवश्यकता नाही’ असे विचार प्रकट केल्याचे वाचले. त्याचप्रमाणे सुशासनाच्या निकषांमध्ये जागतीक बँकेनेही भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याच्या मुद्याला अत्यंत शेवटचे स्थान दिले असल्याचा दावा करून आपण या वादात आपले विचार जागतीक बँकेशी सुसंगत असल्याचाही युक्तिवाद केला आहे.जागतीक बँकेलाही आपले विचार ऐकून धक्का बसेल .खरेतर आपल्या सुशासनाच्या निकषांचा असा अर्थ कुणी काढेल याचा विचार जागतीक बँकेने कधीही केला नसेल.
चीन मध्ये मोठय प्रमाणावर भ्रष्टाचार झाला तरी तीथे विकास झाल्याचे उदाहरण देउन आपण आपला दावा सिद्धदेखील करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व वाचून आश्चर्य वाटले नाही. उलट पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करण्यास आवश्यक असणारी महत्वाची गुणवत्ता आपल्याकडे असल्याने हा कार्यकाळ आपण पूर्ण करणार याबाबत आमच्या मनात आता कोणतीही शंका उरलेली नाही.
आम्ही आतापर्यंत, सुशासनाचे सर्व निक़ष पाळले तर भ्रष्टाचाराला फारसा वाव उरत नाही म्हणून सुशासनाच्या निकषांमध्ये ’ भ्रष्टाचारावर नियंत्रण‘ या मुद्द्याला सर्वात शेवटचे स्थान दिले गेले असावे असे समजत होतो.असो. शेवटी आपली विचारांची बैठक ही अनुभवातून पक्की झाली असल्याने आपले म्हणणे कदाचित खरे असेलही.
आता प्रश्न एवढेच उरतात की आतापर्यंतच्या आपल्या कार्यकाळात किती विकास कामे करण्यात आली. त्यात विकासाचे आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण काय होते? आर्थिक विकासामध्ये भष्टाचाराचे प्रमाण किती असावे, याबाबतीत आपला अनुभव काय आहे ? आपण याची काही निश्चित टक्केवारी ठरवली आहे का? असल्यास ती माहिती आपण पालिकेतील आपल्या सहका-यांना दिली आहे का? असल्यास त्याची माहिती सार्वजनिक करावी . म्हणजे गरजूंना आपल्या अभ्यासपूर्ण निमंत्रणाचा लाभ उठवता येईल.कळावे
उत्तराच्या प्रतिक्षेत
आपले
Nagrik Chetna Manch Surajya Sangharsh Samiti
Maj. Gen. SCN Jatar (Retd) Vijay Kumbhar
Telephone: + 912024475366 / + 919970093533 www.surajya.org
A 102 Neel Sadan, 1426 Sadashiv Peth, Pune 411030 vijaykumbhar.blogspot.in
Visit us at <http://www.nagrikchetna.com> 09923299199