पुणे- दरमहा रस्त्यावर नवीन वाहने येतात २५ हजार आणि शिकाऊ वाहनचालकाचे परवाने दिले जातात ३ हजार … या शासकीय कारभाराबाबत आणि ऑनलाईन शिकाऊ परवाना पद्धती अपयशी ठरल्याने पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्यावतीने आज येथे आंदोलन करण्यात आले
पुणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले . परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांनी सांगितल्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणेच्या प्रशासनाला नवीन परवाना देण्याची संगणक प्रणाली शिकाऊ परवानासाठी लागू करण्यात आली . जुलै २०१४ पासून आजतागायत हि प्रणालीची अंमलबजावणी करण्यात पुणे परिवहन कार्यालय पूर्णपणे अपयशी ठरले आहे . गेल्या अडीचमहिन्यात या प्रणालीत असलेल्या असंख्य त्रुटी आजतागायत दूर करण्यासाठी प्रशासनाला अपयश आले आहे . या प्रणालीत अनेक त्रुटीमध्ये उमेदवारांना विचारण्यात येणारे प्रश्नावलीमध्ये असंख्य चुका आहेत , या चुकीच्या प्रश्नावलीमुळे अनेक उमेदवार अनुउतीर्ण झालेले आहेत . परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या बरोबर पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे पदाधिकारी , सदस्य , रिक्षा संघटनाचे प्रतिनिधी , ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टचे सदस्य बाबा शिंदे , बाबा धुमाळ , रिक्षा संघटनाचे पदाधिकारी बादशहा सय्यद , बापू भावे , विजय रवळे , एकनाथ ढोले , विजय परदेशी , पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुंभार , अध्यक्ष राजू घाटोळे ,सचिव निलेश गांगुर्डे , उपाध्यक्ष चांगदेव मासाळ , विठ्ठल मेहता , कैलास धुमाळ , राजा पंडित , अप्पा शिंदे , दत्ता शिरसागर , अमेय आपटे, निखिल बोराडे , विवेक माळवदे , अनिल अडगळे , राकेश सणस , राहुल निकाळजे , आशिष बाहेती , संजय जाधव , फारुख शेख , निझाम काझी पिंपरी चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत कुंभारआदी मान्यवर उपस्थित होते .
या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील , सहय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख उपस्थित होते .
शिकाऊ परवाना देण्याच्या प्रणालीमध्ये पुणेकर नागरिकासाठी एकूण क्षमतेच्या ५० टक्के कोटा दिल्यानंतर उरलेला राखीव कोटा ड्रायव्हिंग स्कूलमधून आलेल्या उमेदवारासाठी राखीव ठेवावा . केंद्रीय मोटार वाहन कायद्यात असलेल्या तरतुदीप्रमाणे चाचणी परीक्षेतून सूट पुस्तक परवाना , संगणक परवाना स्मार्ट कार्ड परवाना व शिकाऊ लर्निंग परवाना असणाऱ्या उमेदवारांना चाचणी परीक्षेतून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला, परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकाप्रमाणे टपालाद्वारे पाठवण्यात येणारा वाहन परवाना व नोंदणी पुस्तक उमेदवाराला सात दिवसात मिळावे असा आदेश असताना दोन ते तीन महिन्यात वाहन परवाना आणि पाच ते सहा महिने नोंदणी पुस्तक उमेदवारांना वेळेत मिळत नाही त्यामुळे अनेकांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागते . विधीत केलेल्या वेळेत लवकरात लवकर उमेदवारांना मिळतील यासाठी योग्य ते आदेश प्रशासनाला देण्यात येतील .
परिवहन कार्यालय पुणेच्या वतीने किमान चारशे उमेदवारांना ऑनलाईन शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी परीक्षा देता येईल , अशा क्षमतेचि परिपूर्ण यंत्रणा करण्यसाठी आमचा प्रयत्न राहील . तसेच चाचणीत अनुउतीर्ण झालेल्या उमेदवारांना परत पूर्वनियोजित वेळ घेण्याची गरज भासणार नाही . ते उमेदवार दुसऱ्या दिवशी परीक्षा देऊ शकतील .
पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन सलग्न असलेल्या सदर मोटार ड्रायव्हिंग स्कूल साठी स्वतंत्र्य बेचेस प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूलला युसर आय डी आणि पासवर्ड देण्यात यावा . यामागण्या परिवहन आयुक्त कार्यालय यांच्या कडे माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत . नवीन परवाना देण्याची संगणक प्रणाली हि पुणेकर नागरिकांच्या हिताची नसून वेळखाऊ व तिचकट आहे . या प्रणालीत उमेदवारांचा वेळ वाचत नाहीत , लोकांना तिष्ठत उभे राहावे लागते . या प्रणालीत खूप चुका आहेत , त्यामध्ये कुठल्याही सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत , या संगणक प्रणालीचे संथ गतीने चालत आहेत , पुणे शहरात एका महिन्यात २५००० वाहनाची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात होते परंतु याच कार्यालयात शिकाऊ वाहन परवाना महिन्याला तीन हजारे परवाने दिले जातात . त्यामुळे हे प्रमाण व्यस्त आहे , त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन परवाना जलद गतीने देण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली . अजूनही असंख्य अडचणी सोडविण्यात आल्या नाहीत तर पुणेकर नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे,विठ्ठल मेहता यांनी दिला आहे .