पंढरपूर : वारी ही सकारात्मक शक्ती असून या सकारात्मक शक्तीचा उपयोग स्वच्छता, प्रदूषण निवारणाच्या कामासाठी होईल. वारक-यांनी पर्यावरणाचा जागर जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपूर येथे बोलतांना व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांच्या मातोश्री सरिताताई, पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. कार्यक्रमास महसूल मंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री विजय देशमुख, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, आमदार भारत भालके, आमदार रामहरी रुपनवर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणाचा जागर करणारे वारकरी पाहून समाधान वाटले. वारकऱ्यांनी हा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोविण्याचे काम केले आहे. वाऱ्यांमधील या सकारात्मक शक्तीद्वारे राज्यातील गावे स्वच्छ व प्रदूषण विरहित होण्यास मदत होईल. कीर्तन, भारुड, पोवाडा या लोक शिक्षणातून अशी चळवळ उभी राहिल्यास गावाचे परितर्वन होण्यास विलंब लागणार नाही. स्वच्छता व प्रदूषणाचा हा शाश्वत विचार वारकरी गावोगावी पोहचवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करुन त्यांचे अभिनंदनही केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरु माऊलींच्या कवितांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच नागेश घुगे, विष्णूपंत गायकवाड, मोहन घाटे, धिरज यादव आणि ज्ञानेश्वर साबळे या पाच वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवतगीतेचे वितरण करण्यात आले.
तत्पूर्वी ईश्वर महाराज यांनी कीर्तन, चंदाबाई तिवाडी यांनी भारुड आणि शाहीर देवानंद माळी यांनी प्रदूषणावर पोवाडा सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर माऊली……… तुकाराम अशा जय घोषात पर्यावरणाचा जागर करण्यात आला.

तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून पंढरपूर शहराचे स्वरुप बदलू
पंढरपूर – पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात वारक-यांना भजन आणि कीर्तन करण्यास वारीच्या काळात वर्षातून 20 दिवस परवानगी दिल्याने उच्च न्यायालयाचे आभार मानून मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून पंढरपूर शहर आणि चंद्रभागा नदीचा कायापालट करुन त्याचे स्वरुप बदलून टाकू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातर्फे आयोजित स्वच्छता दिंडीच्या समारोप कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सार्वजनिक बांधकाम (सार्व.उप) व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, जि.प. अध्यक्षा जयमाला गायकवाड, आ. भारत भालके, आ. रामहरी रुपनवर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, माधव भंडारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
निर्मल भारत अभियानाला पंतप्रधानांनी गती देण्याचे ठरविले आहे त्यांच्या या स्वप्नपूर्तीला राज्यातील जनतेने बळ द्यावे, स्वत: कचरा करणार नाही व कचरा करु देणार नाही हा संकल्प राज्यातील प्रत्येकाने करावा असे आवाहन करुन मुख्यमंत्री म्हणाले की, संत परंपरेने व्यक्तीला पर्यावरणासोबत जगायला शिकविले आहे. त्याचबरोबर संतांनी समाज-लोकप्रबोधनाचे काम केले आहे. उच्च न्यायालयाने वारक-यांना वाळवंटात कीर्तन व भजनासाठी परवानगी दिली आहे. नदीपात्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी मिळून पार पाडावी. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर शहराच्या विकासासाठी तसेच नदीचे स्वरुप बदलण्यासाठी राज्य शासनातर्फे भरीव निधी दिला जाईल, असे प्रतिपादन करुन संपूर्ण महाराष्ट्र निर्मल होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले की, स्वच्छतेबाबत संतांनी कृतीशील प्रबोधन केले आहे. वारक-यांनी वाळवंट स्वच्छतेला प्राधान्य द्यावे असे आवाहन करुन महाराष्ट्र हे सर्व बाबतीत आदर्श राज्य व्हावे अशी प्रार्थना यावेळी पांडुरंग चरणी करतो असे ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शौचालये बांधकाम तांत्रिक मार्गदर्शिकेसह इतर पुस्तिकांचे प्रकाशन तसेच पालखीत स्वच्छता विषयक प्रबोधन करणा-या दिंडी प्रमुख, कलापथक प्रमुख त्याचबरोबर दिंडी संयोजन करणा-या जिल्ह्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.